Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत आत्मा मलिकचे यश  

कोपरगाव : प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी प्रवेश परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून एकूण १५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्

भाजप कॅबिनेट मंत्र्याच्या पीएचा पत्नीचा गळा आवळून खुनाचा प्रयत्न; वाचवायला आलेल्या पोटच्या मुलालाही बॅटने मारहाण!
गोदा ते नर्मदा अभियानात नागपूरचा सहभाग; मंत्री बावनकुळे यांच्या हस्ते पेंच नदीतील पवित्र जल कलश पूजन
कर्जतमधील घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण : अजिंक्य सूर्यवंशी; ३१ मार्चपूर्वी काम सुरू न केल्यास मंजुरी रद्द

कोपरगाव : प्रतिष्ठित जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता नववी प्रवेश परीक्षेत अहिल्यानगर जिल्ह्यातून एकूण १५ विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यामध्ये आत्मा मलिक आंतरराष्ट्रीय विद्यालयाच्या दिव्या सुधाकर जाधव हिने द्वितीय, तर योगेश्वरी विशाल देशमुख हिने चतुर्थ क्रमांक मिळविला आहे. जिल्ह्यात उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यांनी विद्यार्थीनी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत कार्यरत जवाहर नवोदय विद्यालय समितीमार्फत ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे निवासी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी ही प्रवेश परीक्षा घेतली जाते. स्पर्धात्मक व गुणवत्ताधारित असलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, गणितीय कौशल्य, तार्किक विचारशक्ती आणि शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाते. यंदा आत्मा मलिक आंतरराष्ट्रीय विद्यालयातील दोन विद्यार्थीनींनी यश संपादन केले.
याबाबत दिव्या जाधव हिने सांगितले की, विद्यालयात शैक्षणिक सुविधा उत्तम असून गुणवत्तापूर्ण अध्यापन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि मूल्याधिष्ठित शिक्षणावर विशेष भर दिला जातो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असते.
संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, मीरा पटेल तसेच प्राचार्य नामदेव डांगे यांनी यशस्वी विद्यार्थीनींचे अभिनंदन केले.

COMMENTS