Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शरद पवारांसाठीच’रयत’च्या नियमांना बगल : ओबीसी नेते लक्ष्मण हाके

नांदेड ः रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम असतांना या नियमांत खाडाखोड करत त्याच्या अध्यक्ष पदावर खासदार शरद पव

डॉ. प्रशांत मुरूमकर यांची प्रतिष्ठित वैज्ञानिक सल्लागार मंडळात नियुक्ती
मत्स्यव्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा;
मविआत सांगलीच्या जागेवरून रस्सीखेच

नांदेड ः रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम असतांना या नियमांत खाडाखोड करत त्याच्या अध्यक्ष पदावर खासदार शरद पवाांना कायम करण्यात आले असा गंभीर आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बुधवारी केला आहे.
हाके गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पवार कुटुंबीयांवर टीका करत आहेत. त्यात आता रयत शिक्षण संस्थेमधील पदांवरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हाके नांदेड येथे बोलताना म्हणाले की, शरद पवार व अजित पवार यांच्याच कुटुंबात सर्व पदे आहेत. त्यांना एवढे पद कशासाठी हवेत? रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राज्याचा मुख्यमंत्री असावा असा नियम आहे. असे असतानाही त्या नियमात खाडाखोड करून त्याच्या अध्यक्षपदी शरद पवार यांना कायम करण्यात आले. या संस्थेवर पवार कुटुंबातील सदस्यच का लागतात? कारखाने तुमचे, बँका तुमच्या, शिक्षण संस्थाही तुमच्याच. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरही पवारच आहेत. महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालणार्‍या अजित पवारांनाच सातत्याने अर्थमंत्रीपद का लागते? असे ते म्हणाले.

COMMENTS