Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरात वाहतुकीस अडथळा करणारे धोकादायक विजेचे खांब हटवण्यास प्रारंभ

इस्लामपूर : विजेचे खांब काढण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ना. जयंत पाटील, वैभव साबळे, शहाजी पाटील, खंडेराव जाधव, आयुब हवलदार, दादासो पाटील, विश्‍व

मिनाक्षीताई महाडिक यांचे पद रद्द करु पाहणार्‍यांना चपराक : जगन्नाथ माळी
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात; अटकेची कारवाई सुरू
आंतर महाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत छत्रपती शिवाजी कॉलेजला पाच पदके

इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर शहरातील वाहतुकीस अडथळा करणारे धोकादायक विजेचे खांब काढण्याचा प्रारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ना. पाटील यांनी या कामासाठी जिल्हा नियोजनमधून 13 लाख 50 हजार रुपयांची तरतूद केली आहे. बर्‍याच वर्षाचे एक प्रलंबित काम मार्गी लागत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्याधिकारी वैभव साबळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, खंडेराव जाधव, विश्‍वनाथ डांगे, दादासो पाटील, आयुब हवलदार, उपअभियंता अनिकेत हेंद्रे उपस्थित होते.
ना. पाटील यांच्या हस्ते इस्लामपूर येथील पोस्ट कार्यालया शेजारील विजेचा खांब काढून प्रारंभ झाला. यावेळी प्रभाग क्रमांक 12 मधील माजी नगरसेवक आयुब हवलदार, राजू देसाई, रणजित गायकवाड, जुबेर खाटीक यांनी या कामाबद्दल ना. जयंत पाटील यांचे आभार मानले. याप्रसंगी डॉ. संग्राम पाटील, शंकरराव चव्हाण, संदीप पाटील, संजय जाधव, गोपाळ नागे, राहुल नागे, सुरेश वडार, मोहन भिंगार्डे, अनंत वाळवेकर, गणेश वाळवेकर, अनिल कुपाडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS