Homeताज्या बातम्या

विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप

जामखेड : जामखेड शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसताना नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच शहरातील विंचरणा नदीवरील जुन्या पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पुलावरील रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सततच्या पावसामुळे या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामादरम्यान विंचरणा नदीवर नवीन पूल उभारण्यात आला आहे. मात्र, जुन्या पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही. पुलाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून संपूर्ण मार्ग खड्डेमय झाला आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी, मालवाहू वाहने तसेच पादचाऱ्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.सध्या पावसाचे प्रमाण वाढल्याने खड्ड्यांत पाणी साचत आहे. त्यामुळे वाहनचालकांना रस्त्याची स्थिती दिसत नसल्याने अचानक वाहन खड्ड्यात जात आहे. यामुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिक सांगतात. पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने एखादी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.पुलावरील खड्ड्यांमुळे पादचाऱ्यांनाही जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. एकामागोमाग एक पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वळसा घालण्याचा प्रयत्न करावा लागतो. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांशी धडक होण्याचाही धोका वाढत आहे.विंचरणा नदीकाठी उभारलेल्या भगवान शंकरांच्या मूर्तीजवळ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयालगतच हा पूल आहे. तरीही पुलावरील खड्ड्यांकडे संबंधित विभाग आणि महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. या मार्गावरून लोकप्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारीही नियमित प्रवास करतात. मात्र, अद्यापही खड्डे बुजविण्यासाठी कोणतीही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.महामार्गाचे काम सुरू असल्यामुळे आधीच वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. त्यात खड्ड्यांमुळे वाहतूक आणखी संथ होत असून वाहनांच्या रांगा लागत आहेत. पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनत असल्याने नागरिकांना रोजच मनस्ताप सहन करावा लागत आहे.आंदोलनाचा इशारा दरम्यान, संबंधित विभागाने तातडीने पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करून वाहतूक सुरक्षित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच आवश्यक कामे पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पुलावरील खड्डे तातडीने बुजविले नाहीत, तर नागरिकांकडून तीव्र आंदोलन छेडले जाऊ शकते, असा इशाराही देण्यात येत आहे. 

घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत उघडी विहीरअपघाताचा धोका;  प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
डंपरच्या मुजोरपणामुळे शेवगावकर वैतागले शहरातील वाहतूक कोंडीची समस्या कायम 
पंधरा वर्षांपासून पुलाचे काम अपूर्ण  धोकादायक रस्ता व पुलामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात; भोसे ग्रामस्थांचे उपोषण

COMMENTS