Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विट्यात दोन चिमुरड्यांसह महिलेची आत्महत्या

विटा / प्रतिनिधी : पती बरोबर झालेल्या किरकोळ वादातून विट्यात एका महिलेने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सोनाली बिहुदेव हात्ते

फलटण पोलिसांकडून गुटखाविरोधी कारवाई; 11 जणांविरुध्द गुन्हा दाखल
हिंदू समाजातर्फे इस्लामपुरातील शोभायात्रेत दुमदुमला श्रीरामाचा जयघोष
सह्याद्री सूर्याजीराव उर्फ चिमणराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्त्या

विटा / प्रतिनिधी : पती बरोबर झालेल्या किरकोळ वादातून विट्यात एका महिलेने दोन लहान मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. सोनाली बिहुदेव हात्तेकर (वय 26,रा. शाहूनगर, विटा) असे या महिलेचे नाव असून सोबत चार वर्षांची मुलगी सोनाली आणि एक महिन्याचे चिमुकले बाळ आहे. ही घटना आज सोमवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली.
विटा-नेवरी रस्त्यावर शिवाजीनगरातील ओढ्याजवळ एका विहिरीत 4 वर्षे वयाची मुलगी आणि 3 महिन्याच्या बाळासह एका महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सुरुवातीला ही आत्महत्या की अपघात याबाबत चर्चा सुरू होती. दरम्यान या घटनेबद्दल विटा पोलिसांमध्ये नोंद झाली.
याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, विटा-नेवरी रस्त्यालगत शाहूनगर उपनगरामध्ये ढवळेश्‍वर तलावाकडे जाणार्‍या ओढ्याच्या पात्रात एक जुनी विहीर आहे. या विहिरीत सोमवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान या परिसरात राहणार्‍या नागरिकांना महिलेचा मृतदेह तरंगताना पाहिला. त्यानंतर लोकांनी जवळ जाऊन पाहिले तर त्या ठिकाणी आणखी दोन मृतदेह आढळले. यामध्ये एक लहान मुलगी आणि एक बाळ असल्याचे निदर्शनास आले. त्यावरून तेथील नागरिकांनी विटा पोलिसांना सांगितले. त्यानंतर ही महिला शाहूनगर येथील रहिवाशी असल्याचे सांगण्यात आले.
विहीर जुनी असल्याने कठडा आणि निसरडी वाट असल्याने आत उतरणे अत्यंत कठीण होते. त्यामुळे पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने तिन्ही मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. तिचे पती बिहुदेव हा विट्यातील एका हॉटेलमध्ये काम करतात. आज सकाळी त्यांचा पत्नी सोनाली हिच्याशी वाद झाला होता. वादातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बिहुदेव हातेकर यांना आई-वडील नाहीत तसेच सोनालीलाही आई वडील नाहीत, अशी माहिती विटा पोलिसांकडून मिळाली आहे.

COMMENTS