Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतात सात कोटी सत्तर लाख मधुमेही

अहमदनगर : भारतात सुमारे सात कोटी सत्तर लाख मधुमेह टाइप-2 चे रुग्ण आहेत. यातील निम्म्या रुग्णांना मधुमेह असल्याची जाणीवच होत नसते. लठ्ठपणा आणि मधु

इस्लामपूर पालिका निवडणूकीत प्रभाग 10 मध्ये शिवसेनेला तगडे आव्हान
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे
सातारा जिल्ह्यात पाणी टंचाई; प्रशासनाकडून टँकर सुरू

अहमदनगर : भारतात सुमारे सात कोटी सत्तर लाख मधुमेह टाइप-2 चे रुग्ण आहेत. यातील निम्म्या रुग्णांना मधुमेह असल्याची जाणीवच होत नसते. लठ्ठपणा आणि मधुमेह यांचा परस्परांशी संबंध असून या दोन्ही समस्या एकमेकांशी निगडित आहेत. भारतातील मधुमेही रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. जगभरात 50 दशलक्षपेक्षा अधिक लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत. यात टाइप-2 मधुमेह असणार्‍या रुग्णांची संख्या खूप जास्त आहे. टाइप- 2 मधुमेह होण्यामागील वाढते वजन हे मुख्य कारण आहे.
गेल्या 30 वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा दिसून येत आहे. या बदलत्या काळात लोकांची जीवनशैली आणि आहाराच्या पध्दतीत खूपच बदल झाला. जंकफुडचे नियमितपणे होणारे सेवन आणि शारिरीक व्यायामाचा अभावामुळे लठ्ठपणा वाढत आहे. भारतात मधुमेहाच्या 90 टक्के रुग्णांना टाइप- 2 प्रकारचा मधुमेह दिसून येतो. भारतात सुमारे 7 कोटी 70 लाख मधुमेहाची रुग्ण आहेत. निम्म्या लोकांना टाइप टू डायबेटीज असल्याची जाणीव झालेली नसल्याचे डॉ. प्रख्यात दीक्षित ‘डायट’ चे प्रवर्तक डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी सांगितले.
जगातील बहुतांश मधुमेह तज्ज्ञांच्या संघटना ‘डायबेटीज रिव्हर्सल शक्य आहे असे म्हणतात. आमच्या अभियानात दोन वेळा जेवणे, 45 मिनिटे साडेचार किलोमीटर चालणे हा सल्ला पाळल्याने शेकडो लोकांचा मधुमेह कमी झाला असून त्यांची औषधे बंद झाली असल्याचेही डॉ. जगन्नाथ दीक्षित
(प्रख्यात दीक्षित ‘डायट’चे प्रवर्तक, प्राध्यापक, बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे) यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS