Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी रविवारी विविध 3 ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या क

राज्य उत्पादन शुल्क विभागाची तपास यंत्रणा सक्षम करणार : ना. शंभूराज देसाई
Buldhana : आपण एकजूट दाखवली नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही – डाॅ.राजु वाघमारे
महाबळेश्‍वर येथील साबने रस्ता सुशोभिकरणासाठी सुवर्णमध्य काढावा : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : सातारा शहर व शाहूपुरी पोलिसांनी रविवारी विविध 3 ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकल्या. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या कारवाईने जुगार बहाद्दर व बुकींमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, तीन ठिकाणांहून केवळ 20 हजार रुपयांची रोकड व मुद्देमाल पोलिसांच्या हाती लागला.
राजधानी टॉवर्समध्ये जुगार खेळल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. सागर जयसिंग भोसले (रा. केसरकर पेठ), नरेंद्र जांभळे (रा. शाहूपुरी), यास्मिन शेख (रा. गुरुवार परज) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या कारवाईत रोख 1222 रुपये, जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शाहूपुरी पोलिसांनी दुसरी कारवाई गुजर आळी येथे केली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. विक्रम बाळकृष्ण दुबळे (रा. मंगळवार पेठ), यासिन शेख (रा. गुरुवार परज) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांकडून 7 हजार 972 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तिसरी कारवाई शहर पोलिसांनी पालवी हॉटेलच्या पाठीमागे गोडोली येथे केली आहे. याप्रकरणी जोतीराम कृष्णा कारंडे, सचिन कृष्णा देशमुख (दोघे रा. सिध्देश्‍वर कुरोली ता. खटाव), वसीम इब्राहिम शेख (रा. शनिवार पेठ), मधुकर काकासाहेब माने (रा. लिंबाचीवाडी, ता. सातारा), अतुल बबन पार्टे (रा. आष्टे, पो. नागठाणे, ता. सातारा), सचिन शिंदे (रा. शनिवार पेठ), भावेश संपत कुचेकर (रा. सुरुर, ता. वाई), कटाप्पा साईनाथ इंगळे (रा.चंदननगर, कोडोली), समीर सलीम कच्छी (रा. मोळाचा ओढा) या संशयित आरोपींवर गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईत संशयिताकडून 10 हजार 348 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य आहे. या कारवाईने मटका चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

COMMENTS