Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओळखीतून महिलेवर सामूहिक बलात्कार

पुणे ः पुण्यातील एका 34 वर्षीय पुण्यात राहणार्‍या महिलेची इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर येथील एका तरुणाशी ओळख

अवघ्या 11 वर्षीय चिमुकलीवर 9 जणांकडून सामूहिक बलात्कार.
राजधानीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
शाळेसमोरुन अपहरण करून धावत्या गाडीत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

पुणे ः पुण्यातील एका 34 वर्षीय पुण्यात राहणार्‍या महिलेची इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअप या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोल्हापूर येथील एका तरुणाशी ओळख झालेली होती. सदर ओळखीतून महिलेस एका हॉटेल मध्ये बोलवून संबंधित तरुणाने त्याच्या मित्रासह महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तिच्या नकळत याबाबतचा अश्‍लील व्हिडिओ तयार करुन महिलेकडे दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास महिलेचा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देखील आरोपींनी दिली.
याप्रकरणी पिडित महिलेने आरोपी केतन महादेव चौघुले (व-33,रा.कागल,जि.कोल्हापूर) व त्याचा मित्र शेखर यांचेवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सदरचा प्रकार डिसेंबर 2023 ते 23/4/2024 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला हिची आरोपी केतन चौघुले याच्याशी इन्स्टाग्रामवर ओळख निर्माण झाली होती. आरोपीने तिच्याशी संवाद वाढवून तिच्यासोबत विश्‍वासाचे नाते निर्माण केले. त्यानंतर आरोपीने महिलेस इन्स्टाग्राम व व्हॉटसअपवर वारंवार संर्पक करुन तिला पुण्यातील वेगवेगळया हॉटेल मध्ये बोलवून घेत तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित करतानाचे अशलील व्हिडिओ पाठवले. तसेच एका पोलिस शिपाईच्या मोबाईलवर सदर अश्‍लील व्हिडिओ पाठविण्याची धमकी दिली आहे.

COMMENTS