Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या महिला कर्मचार्‍याच्या डोक्यात कोयत्याने वार

उपचारादरम्यान महिला कर्मचार्‍याचा मृत्यू ; वीज बिल जास्त आल्याने केला हल्ला

पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्

योगींचा ओबीसी प्लॅन!
बाजार समितीचे सभापती संजय जाधव यांचा वाढदिवस युवक कॉंग्रेस तर्फे विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा
ओमिक्रॉनच्या पार्श्‍वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवा : शेखर सिंह

पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील मोरगाव येथे महावितरण कंपनी कार्यालयात एका महिलेवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने येथील महिला कर्मचार्‍यावर कोयत्याने प्राणघातक  हल्ला केला. लाईट बिल जास्त येत आहे, त्यामुळे मीटर चेक करावा अशा आशयाची तक्रार महावितरणकडे या आरोपीने केली होती. मात्र, महावितरणने कोणतीही कार्यवाही न केल्याने अभिजीत पोटे याने महिला कर्मचार्‍यांच्या डोक्यात कोयता मारला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, कोयत्याचा गंभीर वार बसल्याने उपचारादरम्यान, महिला कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे. बारामतीमधील घटनेनंतर महिलेला उपचारासाठी पुण्याला नेण्यात येत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.  
बारामती महावितरण विभागातील घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या महिलेचे नाव रिंकू पिटे असे आहे. या घटनेनंतर सदर महिलेला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिलेला पुढील उपचारासाठी पुण्यात हलवण्यात आले. मात्र, पुण्यात उपचारादरम्यान, महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी बारामतीतील सुपे पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम 307 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती होती. पण, महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आता याप्रकरणी 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो.  दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून आरोपीला ताब्यात घेणयात आले आहे. दुचाकीवरुन आलेल्या  इसमाने टोकाची भूमिका घेत थेट महिला कर्मचार्‍याच्या डोक्यात कोयताच घातल्याने कर्मचार्‍यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी कसून तपास करावा अशी मागणीही कर्मचार्‍यांनी केली आहे.

COMMENTS