Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शब्दगंधची ऑनलाइन श्रध्दांजली सभा उत्साहात

श्रीगोंदा शहर : आपल्या साहित्यिक कृतीतून साहित्यिक समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी विचार देत असतात, त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबा इतकीच

कुटुंब जिव्हाळा आणि शैक्षणिक कळवळा हेच शिक्षकांचे तपोधन ः प्राचार्य अनारसे
कत्तलखाने पुन्हा सुरू होणार नाही, याची खबरदारी घ्या : नगराध्यक्ष वहाडणे
तुकाई’ प्रकल्प प्रलंबित ठेवणार्‍यांवर कारवाई होणार !

श्रीगोंदा शहर : आपल्या साहित्यिक कृतीतून साहित्यिक समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी विचार देत असतात, त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबा इतकीच समाजाचीही हानी होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भास्कर निर्मळ यांनी व्यक्त केले. शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य व वाचकपिठ च्या वतीने शब्दगंध चे सदस्य सेवानिवृत्त मुख्याध्यापक हिराचंद ब्राह्मणे, लोणीप्रवरा, कवी, लेखक सिराज शेख, आंबेजोगाई, जि. बीड व ज्येष्ठ साहित्यिक प्रतितयश कवी डॉ. विशाल इंगोले, मेहकर जि.बुलढाणा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभा शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना सुनील गोसावी म्हणाले की, नवोदितासाठी विविध साहित्य उपक्रम राबवत असताना या तिघांचेही सहकार्य असे, त्यामुळे त्यांची आठवण कायम स्वरुपी मनात राहील. प्राचार्य चंद्रकांत भोसले बोलतांना म्हणाले की, ते आपल्यातून गेले असले तरी पुस्तकं रूपाने सोबत रहातील. यावेळी प्रा. डॉ. अशोक कानडे, कविवर्य चंद्रकांत पालवे, सुभाष सोनवणे, राजेंद्र फंड, शर्मिला गोसावी, भारत गाडेकर, गोकुळ गायकवाड यांनी आठवणी सांगुन श्रध्दांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी आठवणींना उजाळा दिला. अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, शब्दगंध च्या माध्यमातून राज्यभरातील सर्व साहित्यिकांशी संपर्क आलेला असून हे तीनही साहित्यिक अतिशय जवळचे होते. सातत्याने संपर्कात राहून शब्दगंध च्या विविध उपक्रमात सहभागी होत होते.त्याचबरोबर इतरांनाही शब्दगंध शी जोडून घेत होते. आणि म्हणून त्यांची आठवण कायम येत राहील. शाहिर भारत गाडेकर यांच्या पसायदानाने सभेची सांगता झाली. यावेळी रवींद्र धस, साहेबराव तुपे, संतोष ब्राह्मणे, बबनराव गिरी, डॉ सुनील पवार, महादेव भोसले,सुमेध ब्राह्मणे यांच्यासह अनेक साहित्यिक उपस्थित होते.

COMMENTS