Homeताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या घोषणेनंतर शेवगावात जल्लोष; क्रांती चौकात फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी

oplus_2097154 शेवगाव: केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद

दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद; व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी सहभागी व्हावे: अनिल डोंगरे
NEET परीक्षा यंत्रणेची जबाबदारी ‘UPSC’ कडे सोपवा; ॲड. प्रकाश आंबेडकरांची मागणी; केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचीही केली जोरदार मागणी
दिल्लीत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन हिंसक; पोलिसांवर हल्ला, इंटरनेट सेवा बंद, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी संसदेवर मोर्चाचा प्रयत्न
oplus_2097154

शेवगाव: केंद्र सरकारने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शेवगाव येथे वंचित बहुजन आघाडी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आदी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला.

शेवगाव येथील क्रांती चौकात एकत्र येत कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

देशाच्या आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे भाजप सरकारला आपल्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागला, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे. या प्रकरणाचे मूळ हे महाराष्ट्र राज्यामध्ये असल्याकारणाने राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी शेवगाव शिवसेनेचे तालुकाप्रमुख ॲड. अविनाश मगरे यांनी केली.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, उबाठा गटाचे तालुकाध्यक्ष ॲड. अविनाश मगरे, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय लहासे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख प्यारेलाल, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे गोरक्ष काकडे, तालुका सेक्रेटरी संदीप इथापे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पदाधिकारी विजय हुसळे यांच्यासह अजिंक्य लव्हाट, शिवाजी मडके, बबनराव पवार, दत्तात्रय आरे, विष्णू गोरे, कानिफ कर्डिले, उदय गांगुर्डे, रमेश पाटील, प्रवीण दुबे, सलीम जिलानी, ऑगस्टीन गजभिव, लक्ष्मण मोरे, भीमा गायकवाड, किसनराव डाके, इस्माईल पठाण, रज्जाक सय्यद आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS