Homeताज्या बातम्या

पंढरपुरात खळबळ; किरकोळ वादातून रिक्षाचालकाची निर्घृण हत्या, रेल्वे ट्रॅकवर आढळला छिन्नविच्छिन्न मृतदेह

सोलापूर/पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात एका रिक्षाचालकाची किरकोळ वादातून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकी

नांदेडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ‘निवडक’ भेटींची जोरदार चर्चा; लोकप्रतिनिधींना डावलून गुत्तेदारांशीच जवळीक?
भोकर पोलिसांची मोठी कारवाई; बनावट पावत्यांच्या आधारे खत विक्री करणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड, फरार आरोपीस अटक
बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; डेहराडूनमध्ये प्रचंड तणाव, जाळपोळ आणि दगडफेक; ४ आरोपी अटकेत
नागपुरातील वाठोड्यात तरुणाची निर्घृण हत्या : लहान भावानेच केला घात -  Marathi News | The murder of a young man in Wathora in Nagpur: a murder  committed by a younger brother |

सोलापूर/पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात एका रिक्षाचालकाची किरकोळ वादातून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रोहित मधुकर कोरे असे हत्या झालेल्या रिक्षाचालक तरुणाचे नाव आहे. या भयानक हत्याकांडामुळे पंढरपूर आणि परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी रोहितची हत्या केल्यानंतर त्याचे पाय घराच्या दरवाजाला अडकवून ठेवले होते. त्यानंतर या तरुणाचा मृतदेह पंढरपूर येथील रेल्वे ट्रॅकवर छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आला. हत्येच्या या थरारक घटनेची माहिती मिळताच पंढरपूर शहर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अज्ञात मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. किरकोळ वादाचे नेमके कारण काय होते आणि या हत्येमागे कोण आहे, याचा सखोल तपास पंढरपूर पोलीस करत आहेत.

COMMENTS