भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी ओव्हरफ्लो.

Homeताज्या बातम्याअहमदनगर

भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी ओव्हरफ्लो.

अहमदनगर  जिल्ह्याला   वरदान ठरलेले भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले आहे.11 टी एम सी क्षमतेचे  भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मागील ३ दिवस

श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक उतरले रस्त्यावर l LokNews24
Sangamner : गणपती काळात मिरवणुकीवर बंदी

अहमदनगर  जिल्ह्याला   वरदान ठरलेले भंडारदरा धरण काल रविवारी सकाळी ओव्हरफ्लो झाले आहे.11 टी एम सी क्षमतेचे  भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात मागील ३ दिवसांपासून सुरू असलेल्या पर्जन्यमानामुळे काल सकाळी ११ वा. धरणाचा पाणीसाठा ११०३९ दलघफू  म्हणजे शंभर टक्के भरले.
दोन तीन दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात  नवीन पाण्याची आवक सुरू हाेती. काल दिवस भराच्या 12 तासात धरणात 236 दलघफु पाण्याची आवक झाली,
 धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्याच्या दृष्टीने काल सायंकाळपासून विद्युतगृह क्रमांक 1 च्या टनेलमधून 820 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. नेहमी 15 ऑगस्टपूर्वी हे धरण  भरते मात्र यावेळी उशिरा महिना भराने भरले  जिल्हा परिषदेचे माजीं अध्यक्ष जेष्ठ नेते अशोकराव भांगरे, सुनीताताई भांगरे शेंडी चे   सरपंच दिलीपराव भांगरे यांच्या हस्ते जलाशयाचे पूजन करण्यात आले.  गणपती बाप्पा च्या आगमना बरोबरच  पाणलोटात जोरदार पावसाचे  पुनरागमन झाल्याने  आज हे धरण काठोकाठ भरले आहे. आता  प्रवरा नदीवर असणारे  दुसरे  धरण म्हणजे निळवंडे धरण भरण्या ची प्रतीक्षा  सुरू झाली आहे  त्यामुळे पाणलोटासह लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या रतनवाडीत गत दोन दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. गुरूवारी 156 मिमी तर शुक्रवारी 127 मिमी पावसाची नोंद झाली. भंडारदरा, घाटघर, पांजरे आणि वाकीतही जोरदार पाऊस कोसळत आहे.
वाकीचा ओव्हरफ्लो वाढला असून तो 789 क्युसेक असून निळवंडे धरणातही पाण्याची आवक वाढू लागल्याने या धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.

मुळा धरण भरण्याची आशा निर्माण झाल्याने लाभक्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे तर पाणलोट क्षेत्रात अकोले तालुक्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने भात पिकाला संजीवनी मिळाली आहे.

COMMENTS