Homeताज्या बातम्यादेश

ज्येष्ठ वकील हरीश साळवे तिसर्‍यांदा विवाहबंधनात

विवाहसोहळ्यासाठी ललित मोदी, नीता अंबानीची उपस्थिती

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात ज्येष्ठ वकील आणि देशातील बड्या आणि प्रभावशाली व्यक्तिंपैकी एक असलेले हरिश साळवे हे वयाच्या 6

आंदोलनाचा इशारा देताच वीजपुरवठा सुरळीत
टोलवरून खडाजंगी
टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये PM मोदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः सर्वोच्च न्यायालयाचे प्रख्यात ज्येष्ठ वकील आणि देशातील बड्या आणि प्रभावशाली व्यक्तिंपैकी एक असलेले हरिश साळवे हे वयाच्या 68 व्या वर्षी तिसर्‍यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या पत्नीचे नाव त्रिना असून लंडनमध्ये झालेल्या त्यांच्या भव्य विवाहसोहळ्यात नीता अंबानी, ललित मोदी यांसारखे अनेक बडे उद्योगपती आणि राजकारणी देखील त्यांच्या लग्नाला उपस्थित होते.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साळवे आणि बीना हे एकत्र दिसत आहेत. वकील कुमार मिहिर मिश्रा यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवर साळवे यांच्या लग्न समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. वकील साळवे यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मीनाक्षी असून दोघांचे लग्न जवळपास 38 वर्षे टिकले, मात्र जून 2020 मध्ये दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. साळवे यांना पहिल्या पत्नी पासून साक्षी आणि सानिया या दोन मुली आहेत. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर साळवी यांनी ब्रिटिश कलाकार कॅरोलिन ब्रॉसार्डशी ऑक्टोबर 2020 मध्ये लग्न केले होते. मात्र, हे लग्न काही काळच टिकले.

COMMENTS