हात पाठीमागे बांधून दोघा मजुरांना अमानुष मारहाण!

Homeताज्या बातम्या

हात पाठीमागे बांधून दोघा मजुरांना अमानुष मारहाण!

सोलापूरच्या माढा तालुक्यातील धक्कादायक घटना

सोलापूर प्रतिनिधी-  सोलापूरच्या माढा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा मजुरांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोघा मजुरांचे

शेवगामध्ये ट्रकच्या चाकाखाली चिरडून दोघांचा मृत्यू
नांदेडच्या 6 तालुक्यांची तेलंगणात समावेशाची मागणी
तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन मध्ये ’डाईंग व प्रिंटींग’ पाच दिवसीय कार्यशाळेची सांगता

सोलापूर प्रतिनिधी-  सोलापूरच्या माढा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोघा मजुरांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीत दोघा मजुरांचे हात पाठीमागून बांधून लाथा बुक्क्यांनी, शिविगाळ करत बेदम मारहाण करण्यात आली आहे. कामाचे पैसे घ्यायला या, असं म्हणत दोघा मजुरांना बोलावण्यात आलं असून चौघांनी मिळून त्यांना मारहाण केली. ही धक्कादायक प्रकार माढा तालुक्यामधील भुताष्टे गावातील असून याप्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. या प्रकरणी चौघांविरोधात अॅट्रोसिटी, मारहाण आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून माढा पोलीस या घटनेप्रकरणी पुढील  तपास करत आहेत.

COMMENTS