Homeताज्या बातम्याविदेश

इंडोनेशियातील भूकंपामध्ये 70 जणांचा मृत्यू

जकार्ता वृत्तसंस्था : इंडोनेशिया(Indonesia) शी राजधानी जकार्ता(Jakarta) भूकंपाने हादरले आहे. तब्बल 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असून या

पहाटेच्या सुमारास तीन देशांना भूंकपाचे धक्के!
भूकंपाच्या धक्क्याने लातूर पुन्हा हादरले
दिल्ली, पंजाबसह हरियाणात भूकंपाचे धक्के

जकार्ता वृत्तसंस्था : इंडोनेशिया(Indonesia) शी राजधानी जकार्ता(Jakarta) भूकंपाने हादरले आहे. तब्बल 5.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप असून यात तब्बल 70 पेक्षा अघिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 300 व्यक्ती जखमी झाले आहेत. इंडोनेशियातील जावा प्रांत हा या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिक घाबरून रस्त्यावर आले. अमेरिकेच्या जिओलॉजीकल सर्वेने म्हटले आहे की जावा येथील सियांजुर येथून 10 किमी अंतरावर हा केंद्रबिंदु असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंडोनेशियातील भूकंप हे महाभयंकर त्सुनामीची आठवण करून देणारे असतात. मात्र सध्या जाणवत असलेले भूकंपाचे धक्के त्सुनामीत रुपांतरीत होणार नाहीत, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे हे भूकंपाचे झटके जाणवले. शुक्रवारीदेखील जकार्ता येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. मात्र सोमवारी 5.6 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याने येथील इमारती हलू लागल्या. अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले. इमारती, कार्यालयांमध्ये ठेवलेले फर्निचर आणि इतर वस्तू हलू लागल्या. एका प्रत्यक्षदर्शीने म्हटले, आम्ही एवढे घाबरलो की सगळेच जण फक्त इमारतीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत होतो. प्रत्येकाला लवकरात लवकर इमारतीच्या बाहेर पडायचे होते. इंडोनेशियातील पश्‍चिम जावा प्रांतात या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले.  इंडोनेशिया द्वीपसमुह हा भूकंपप्रवण क्षेत्र आहे. या ठिकाणी नेहमीच भूकंप येत असतात. तब्बल 27 कोटी नागरिक भूकंप आणि ज्वालामुखीच्या स्फोटामुळे प्रभावित होत असतो. याच महिन्यात फेब्रुवारी महिन्यात 6.2 तीव्रतेचा भूकंप आल्याने 25 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 460 पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. तर जानेवारी 2021 मध्ये देखील झालेल्या भूकंपामुळे तब्बल 100 नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर तब्बल 6 हजार 500 नागरिक जखमी झाले होते.

COMMENTS