Homeताज्या बातम्या

पत्रकार विनोद जवरे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान; माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते गौरव

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) कोपरगाव तालुक्याचे माजी सचिव विनोद नामदेव जवरे यांना ज्ञानदीप संस्कारम् फाउंडेशनच्या वतीने म

वाकलेले पोल व वीज वाहिन्या तातडीने दुरुस्त करा; आमदार आशुतोष काळे यांचे महावितरणला कडक निर्देश
‘एसएसजीएम’मध्ये माजी विद्यार्थी संघ कार्यकारिणीची बैठक उत्साहात; आमदार विवेक कोल्हे यांच्यासह मान्यवरांचे अभिनंदन
काळे गटाचे बिंग फुटले, आंदोलनाच्या नौटंकीचा डाव उधळला : उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशूर यांचा घणाघात

कोपरगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) कोपरगाव तालुक्याचे माजी सचिव विनोद नामदेव जवरे यांना ज्ञानदीप संस्कारम् फाउंडेशनच्या वतीने माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

धोंडेवाडी या छोट्याशा गावातील पाच मित्रांनी स्थापन केलेली ज्ञानदीप संस्कारम् फाउंडेशन ही स्वयंसेवी संस्था राज्यातील अनाथ, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व संधी उपलब्ध करून देते. या संस्थेने मागील ५ वर्षांत राज्यातील १४५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली असून, झोपडपट्टीतील व बेघर मुलांसाठी तीन वर्षे रस्त्यावर रात्रशाळा चालवली आहे. तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तीन वर्षांपासून मोफत अध्ययन केंद्रही सुरू केले आहे. अशा या प्रतिष्ठित सामाजिक संस्थेच्या वतीने पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासून अहोरात्र कार्य कार्यरत असलेल्या विनोद जवरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याप्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब रहाणे, माजी सरपंच बाबुराव थोरात, युवा उद्योजक सचिन गाढे, ज्ञानदीप संस्कारम् फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल दरेकर आणि बाळासाहेब गव्हाणे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS