Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव

बीड : मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, या निकालाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली

महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हनुमान नगर येथे उत्साहात ध्वजारोहण
उमरी/सावंतवाडी प्रीमियर लीगवर ‘यजमान’ उमरी संघाचे वर्चस्व; दहीटना उपविजेता! विष्णुभाऊ घुले यांच्या हस्ते 51,111 चे प्रथम पारितोषिक प्रदान
जुना वादातून केजच्या सुर्डी फाटा येथे भरदिवसा हत्या; आरोपीला तासाभरात बेड्या
मस्साजोगमध्ये संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव का झाला? भावनिक लाटही चालली  नाही, विजयी उमेदवार स्वरुपानंद देशमुख कोण? - Marathi News | Massajog  Sarpanch ...

बीड : मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल बुधवारी जाहीर झाला असून, या निकालाने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्‍विनी देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, त्यांच्या प्रतिस्पर्धी स्वरूपानंद देशमुख यांनी 92 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर सरपंचपद रिक्त झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्‍विनी देशमुख यांनी उमेदवारी दाखल केल्याने निवडणुकीला भावनिक रंग चढला होता. मात्र, मतदारांनी वेगळा कौल दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले. या निवडणुकीसाठी काल मतदान पार पडले होते, तर आज केज तहसील कार्यालयात मतमोजणी करण्यात आली. एकूण तीन फेर्‍यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया झाली. सुरुवातीपासूनच अश्‍विनी देशमुख या पिछाडीवर असल्याचे चित्र दिसून आले. पहिल्या फेरीत स्वरूपानंद देशमुख यांनी तब्बल 156 मतांची आघाडी घेतली होती. दुसर्‍या फेरीतही त्यांनी 20 मतांची आघाडी कायम ठेवली. अंतिम फेरीअंती ही आघाडी टिकवून ठेवत त्यांनी 92 मतांनी विजय मिळवला. निकाल जाहीर होताच स्वरूपानंद देशमुख यांच्या समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. दुसरीकडे, अश्‍विनी देशमुख यांच्या पराभवामुळे सहानुभूतीच्या लाटेवर निवडणूक जिंकता येतेच असे नाही, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या निकालामुळे मस्साजोग ग्रामपंचायतीतील आगामी राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, स्थानिक पातळीवरील मुद्द्यांना मतदारांनी प्राधान्य दिल्याचेही या निकालातून स्पष्ट होत आहे.

COMMENTS