Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘समता चित्ररथा’चे नागपुरात उत्स्फूर्त स्वागत; महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त उपक्रम

नागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तयार करण्यात आले

बहुजन समता पार्टीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी दिगंबर खुडे यांची नियुक्ती
हळदी कार्यक्रमात दोन गटांत हाणामारीदोन्ही बाजूंनी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल
लोणी व्यंकनाथमध्ये सेवानिवृत्त भूमिपुत्रांचा गौरव; रवींद्र चव्हाण मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम
Nagpur Welcomes Samata Parishads Chitra Rath for Mahatma Phule Jayanti

नागपूर : क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेला “समता चित्ररथ” रविवारी नागपूर शहरात दाखल झाला. संविधान चौकात सकाळी नागरिकांसाठी या चित्ररथाच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहून चित्ररथाचे उत्साहात स्वागत केले.

महात्मा फुले यांच्या सामाजिक कार्याचा आणि समतेच्या विचारांचा प्रचार व्हावा, या उद्देशाने हा विशेष चित्ररथ राज्यभर फिरवला जात आहे. केंद्र व राज्य शासनाकडून ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत ‘महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष’ विविध उपक्रमांनी साजरे केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

माजी खासदार समीर भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांच्या संकल्पनेतून या चित्ररथाची उभारणी करण्यात आली आहे. या चित्ररथात महात्मा जोतीराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे आकर्षक अर्धपुतळे, तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा साकारण्यात आला आहे. यासोबतच राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ही प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत.

COMMENTS