Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साहेबराव निधाने यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार 

राहाता : माजी नगराध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव निधाने यांना मिळालेला राज्यस्तरीय ‘समाजभूषण’ पुरस्कार हा राहाता शहरासाठी भूषणावह व अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकेतर संघटनेचे नेते भागवतराव आरणे यांनी केले. अहिल्यानगर येथील जीवनसाथी वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने निधाने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्तीनिमित्त राहाता शहरात बाबा कट्टा ग्रुपच्या वतीने त्यांचा उद्योजक शंकरभाऊ येवलेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राहाता तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे, संदीप वाव्हळ, धनंजय वाकचौरे, माजी नगरसेवक विजयराव शिंदे, रयत सेवक सुनील बोठे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तुपे, माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, उद्योजक अमोल झळके, दीपक सोळंकी, वंजारी समाजाचे नेते मदन तारगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  याप्रसंगी आरणे म्हणाले, की साहेबराव निधाने यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये पदे भूषविताना सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला. स्पष्टवक्तेपणा व निस्वार्थी वृत्ती ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये असून त्यांनी सामाजिक स्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबवून गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन कोणताही स्वार्थ न ठेवता मदत करणारा नेता म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख निर्माण झाली आहे.  राहाता तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना साहेबराव निधाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

शिवी दिल्यास ५०० रुपयांचा दंड; कोळगावात महिला ग्रामसभेचा निर्णय
विधानसभेत हुंडाबळी कायद्याच्या कथित गैरवापराबाबत आ. पाचपुते आक्रमक
श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

राहाता : माजी नगराध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव निधाने यांना मिळालेला राज्यस्तरीय ‘समाजभूषण’ पुरस्कार हा राहाता शहरासाठी भूषणावह व अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकेतर संघटनेचे नेते भागवतराव आरणे यांनी केले.

अहिल्यानगर येथील जीवनसाथी वधू-वर सूचक मंडळाच्या वतीने निधाने यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारप्राप्तीनिमित्त राहाता शहरात बाबा कट्टा ग्रुपच्या वतीने त्यांचा उद्योजक शंकरभाऊ येवलेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी राहाता तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब सोनवणे, संदीप वाव्हळ, धनंजय वाकचौरे, माजी नगरसेवक विजयराव शिंदे, रयत सेवक सुनील बोठे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तुपे, माजी नगरसेवक राजेंद्र अग्रवाल, उद्योजक अमोल झळके, दीपक सोळंकी, वंजारी समाजाचे नेते मदन तारगे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 याप्रसंगी आरणे म्हणाले, की साहेबराव निधाने यांनी नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच विविध सहकारी संस्थांमध्ये पदे भूषविताना सर्वसामान्यांच्या हिताचा विचार केला. स्पष्टवक्तेपणा व निस्वार्थी वृत्ती ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये असून त्यांनी सामाजिक स्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबवून गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन कोणताही स्वार्थ न ठेवता मदत करणारा नेता म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख निर्माण झाली आहे.

 राहाता तालुका प्रेस क्लबचे अध्यक्ष रामकृष्ण लोंढे यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना साहेबराव निधाने यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

COMMENTS