Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीएचडी करुन दिवे लावणार का ?

अजित पवारांच्या वक्तव्यानंतर विद्यार्थी आक्रमक

पुणे ः राज्य विधिमंडळाचे नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करून दिवे लावणार का ? असा सवाल केल्य

नवी मुंबई विमानतळचा पहिला टप्पा मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होणार
अजित पवारांचा पक्षासह चिन्हावर दावा
अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी लालबागच्या राजाच्या चरणी कार्यकर्त्याकडून चिठ्ठी..

पुणे ः राज्य विधिमंडळाचे नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे, या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएचडी करून दिवे लावणार का ? असा सवाल केल्यानंतर विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठासमोर पीएचडीचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीच्या राजकारणावर एखादा विद्यार्थी पीएचडी करेल ही अजित पवारांना भीती आहे का? असा सवाल पीएचडीचा अभ्यास करणार्‍या कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनी अजित पवार यांना केला आहे.
संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणे हे गरजेचे आहे. देशात आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी पीएचडी मिळवली आहे, त्या सगळ्यांचा अपमान अजित पवार यांनी केला आहे, अशी प्रतिक्रिया या विद्यार्थ्यांनी दिली आहे. यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. पुण्यात देखील विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः दहावी नापास आहेत. त्यांनी पीएचडी संदर्भात कुठलेही वक्तव्य करू नये आणि केलेल्या वक्तव्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली आहे. सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. यातच पीएचडी करण्यासाठी शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. मात्र ती केवळ 200 विद्यार्थ्यांना दिली जाते. ही संख्या वाढवण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधानपरिषदेत केली. यावर राज्यात होत असलेल्या पीएचडींपैकी खरेच किती पीएचडींची आपल्याला गरज आहे? संख्या वाढवून काय करणार? पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार? असे धक्कादायक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भर सभागृहात केले होते.

COMMENTS