Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अवैध धंदे बंद करण्यासाठी सुरु असलेल्या आंदोलनाची 11 व्या दिवशी सांगता  

उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर पाटलांनी दिले लेखी आश्वासन

बुलढाणा प्रतिनिधी - अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे व पत्रकार इसरार देशमुख हे जिल्हा पोलिश अधिक्षक कार

शेतकर्‍यांचे पशुधन चोरणारे 4 तासात जेरबंद
महाविकास आघाडी संघर्षात; तर, वंचित अस्तित्वाच्या लढ्यात !
व्यक्तीचा जीव वाचवायला गेला रेल्वे कर्मचारी ;इतक्यात आली ट्रेन अन्…| LokNews24

बुलढाणा प्रतिनिधी – अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे युवा प्रदेशाध्यक्ष पुरुषोत्तम बोर्डे व पत्रकार इसरार देशमुख हे जिल्हा पोलिश अधिक्षक कार्यालय समोर बुलढाणा, रायपूर, चिखली पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे, वरली, मटका, जुगार अड्डे बंद करण्यासाठी बेमुदत आंदोलन दिनांक २६ जानेवारी २०२४ पासुन सुरु होते, त्या आंदोलनाची सांगता उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर पाटिल यांनी लेखी पत्र देउन बुलडाणा शहर,चिखली, रायपुर हददीतील अवैध धंदे बंद करन्याचे आश्वासन दिले, या वेळी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार ठाकरे, पीएसआय लोधी उपस्थित होते.

तसेच सदर प्रकरणी यापुर्वी वरील पोलीस स्टेशने हददीमध्ये अवैध धंदे होणार नाहीत यादृष्टिने प्रभावी कार्यवाही करण्यात आलेली असुन, सध्या सुध्दा अवैध धंदयावर वेळोवेळी कारवाई करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आमचे अधिनस्त पो स्टे प्रभारी अधिकारी, उपविभाग बुलडाणा यांना अवैध धंदे सुरु राहणार नाही. याकरीता आदेशित करण्यात आलेले आहे.अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचे दृष्टिने कार्यवाही करण्यात येत आहे. तरी आपण आपले  जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु केलेले धरणे आंदोलन मागे घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे लेखी अश्वाशित केले. तर या आंदोलनास अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष इंजि.डी.टी शिपने, जिल्हाध्यक्ष प्रकाश डोंगरे,काँगेस नेत्या ॲड जयश्री ताई शेळके,भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे, खासदार प्रतापराव जाधव, वरोडीचे सरपंच सुधाकर गारोळे, आंदोलन सम्राट भारत चव्हाण यांच्या सह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी भेटी देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

COMMENTS