Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाच लाखासांठी महिलेचा सासरी छळ, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कोपरगाव/प्रतिनिधी ः नवर्‍याला दुचाकी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावे. यासाठी एका महिलेचा तिच्या सासरी छळ करून तिला उपाशी पोटी मारहाण करू

केडगाव परिसरात दहशत माजवणारा आरोपी जेरबंद l पहा LokNews24
महंत सुभाष गिरी महाराज अनंतात विलीन | LOKNews24
गांधी जयंतीनिमित्त तरडगाव ग्रामस्थांनी घेतली ग्रामस्वच्छतेची शपथ

कोपरगाव/प्रतिनिधी ः नवर्‍याला दुचाकी घेण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणावे. यासाठी एका महिलेचा तिच्या सासरी छळ करून तिला उपाशी पोटी मारहाण करून घराबाहेर काढून माहेरी धाडून दिले असल्याचा गुन्हा आरोपी नवरा करण धोंडीराम होंडे,सासू मंगल धोंडीराम होंडे,दिर संजीत धोंडीराम होंडे,नणंद अर्चना सुरेश पारखे आदी विरुद्ध फिर्यादी महिला पूजा करण होंडे (वय-23वर्ष) हिने गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोळपेवाडीसह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सन-1986 मध्ये हुंड्यापासून संरक्षण देण्यासाठी कलम 498(अ) या कलमाची तरतूद करण्यात आली असून.हुंड्याच्या मागणीसाठी शारिरीक अथवा मानसिक अशा कोणत्याही पद्धतीने महिलेचा छळ केल्यास या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येतो. मात्र या गुन्ह्यात कमी आल्याचे दिसत नाही. अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे नुकतीच घडली आहे.

फिर्यादी महिला पूजा होंडे हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले लग्न कोळपेवाडी येथील तरुण करण होंडे यांचेशी दि.01 डिसेंबर 2021 रोजी मोठ्या थाटात झाले होते. सुरुवातीचा नव्यानवलाईचा दोन महिन्याचा काळ वगळता सासरच्या मंडळींनी आपल्याला त्रास देण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आपण आपल्या नवर्‍यास दुचाकी घेण्यासाठी व लग्नाच्या कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी आपल्या माहेरावरून आई-वडिलांकडून 5 लाख रुपये आणून देण्यासाठी तगादा लावला. ते न दिल्याने तसेच घरातिल काम येत नाही. म्हणून तिचा नवरा,सासू,दीर,नणंद आदीं आरोपीनीं तिचा दि.05 फेब्रुवारी 2022 पर्यंत वारंवार शारीरिक मानसिक छळ केला आहे. व तिला उपाशीपोटी ठेवून रात्री-अपरात्री घराबाहेर काढून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वाईट-साईट शिवीगाळ करून तिला जीवे मारण्याची धमकी दिली. असा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद क्रं.अनुक्रमे 418/2023 भा.द.वि.कलम 498(अ),323,504,506,34 अन्वये गुन्हे दाखल केले आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वांढेकर हे करीत आहे.

COMMENTS