कोपरगाव : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया यांसह विविध साथीचे आजार पसरण्याची श

कोपरगाव : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. परिणामी डेंग्यू, मलेरिया यांसह विविध साथीचे आजार पसरण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने शहरात डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या पाणी साठवणाऱ्या कंटेनरचा सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून, ही मोहीम सध्या प्रगतीपथावर आहे. नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष पराग संधान यांनी केले आहे. पावसाळ्यात घरांच्या परिसरात, मोकळ्या जागेत तसेच भंगार साहित्यामध्ये पाणी साचून राहते. जुने टायर, प्लास्टिकचे डबे, कुंड्या, भंगार साहित्य आदींमध्ये साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होऊन त्यांची संख्या झपाट्याने वाढते. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने ६ ऑगस्टपासून घरोघरी जाऊन डासांच्या संभाव्य उत्पत्तीस्थळांची तपासणी व कंटेनर सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे. नगराध्यक्ष पराग संधान, मुख्याधिकारी अजित निकत तसेच नगरसेविका व महिला-बालकल्याण विभागाच्या सभापती सविता मंजूळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. कोपरगाव ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय आणि महिला बचत गटातील महिला प्रतिनिधींच्या सहकार्याने सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. या मोहिमेत नगरपालिकेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेचे रामनाथ जाधव, समृद्धी शहर स्तर संघाच्या व्यवस्थापक हर्षा पाटील, संसाधन व्यक्ती हेमा तवरेज तसेच ग्रामीण रुग्णालयाचे सुनील काळे, रामेश्वर इंगळे, योगेश कोळी, निवृत्ती माने, अजय अंतरकर, निलेश सूर्यवंशी यांच्यासह महिला बचत गटातील महिला सदस्य सहभागी झाले आहेत.

COMMENTS