Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात होणार गुणवंतांचा सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात  शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ’वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ आय

नेप्ती फाट्यावर संतप्त शेतकरी ग्रामस्थांचा भारनियमन विरोधात रास्ता रोको
लस न घेतलेल्यांना पेट्रोल व रेशन नाही : पालक मंत्री मुश्रीफ
अकरावीचे प्रवेश होणार दहावीच्या गुणांवरच l DAINIK LOKMNTHAN

कोपरगाव प्रतिनिधी ः रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात  शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ’वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ’ आयोजित करण्यात आलेला आहे. महाविद्यालयाने नुकतेच 3.69 या उच्चतम गुणांसह नॅकचे ए ++  हे मानांकन प्राप्त केले आहे. महाविद्यालयातील विविध बाबींबरोबरच शिक्षक-शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांनी अनेक वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होऊन केलेली विशेष कामगिरी, मिळविलेले पुरस्कार, पारितोषिके, क्रीडा, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात दाखविलेले विशेष नैपुण्य यांचा यात मोठा वाटा आहे.
यामुळे उच्चतम मानांकनाच्या आनंदी व उत्साही पार्श्‍वभूमीवर होणार्‍या या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे विशेष महत्त्व आहे. या समारंभाचे अध्यक्षपद रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे हे भूषविणार असून, प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.प्रिं.डॉ.ज्ञानदेव म्हस्के हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी आणि जनरल बॉडी सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. या समारंभात कै. सुशीलाबाई (माई) शंकरराव काळे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचाही सन्मान व पारितोषिक वितरण होणार आहे. तरी या स्पर्धेत क्रमांक प्राप्त केलेल्या सर्व यशस्वी स्पर्धकांनीही या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बी. आर. शेंडगे व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. आर आर सानप यांनी केले आहे.

COMMENTS