Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला

कीव : युक्रेनमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले आणि रात्रीचा शांत अंधार क्षणात भीतीच्या वातावरणात बदलला. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध

‘होर्मुझ’ खुली होताच कच्च्या तेलाच्या किमतीत 11 टक्क्यांची घसरण
अटलांटिकमध्ये अडकलेलं ‘डेथ शिप’! २०० जीवांवर मृत्यूचं सावट
इराण-अमेरिका तणाव कायम; युद्धविरामावर मतभेद
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला;  झेलेन्स्कींनी अमेरिकेच्या मौनावर काय म्हटलं? - BBC News मराठी

कीव : युक्रेनमध्ये पुन्हा एकदा सायरन वाजले आणि रात्रीचा शांत अंधार क्षणात भीतीच्या वातावरणात बदलला. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध आता पुन्हा एकदा अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याचे दिसून येत आहे. 24 ते 25 एप्रिलच्या मध्यरात्री रशियाने हवाई हले केला, ज्यामुळे सगळीकडे तणावाचे वातावरण पसरले. युक्रेनच्या वायुसेनेने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला संध्याकाळी साधारण 6 वाजल्यापासून सुरू झाला आणि रात्रीभर सुरूच होता. एकूण 666 हल्ले करण्यात आले, ज्यात 47 मिसाइल्स आणि तब्बल 619 ड्रोनचा समावेश होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी हल्ला झाल्यामुळे परिस्थिती फारच गंभीर होती.

COMMENTS