Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छेडछाडीला कंटाळून विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

विषारी औषध केले सेवन डॉक्टरांनी कळवूनही पोलिसांचे मात्र कानावर हात

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका किराणा दुकानाच्या मालकासह एका कामगाराने किराणा दुकानात काम करणार्‍या एक

युवान आयोजित प्रेरणा कार्यक्रमात यु.पी.एस.सी. मधील गुणवंतांचा गौरव
‘वाराई’च्या प्रश्नासंदर्भात व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये : जिल्हाधिकाऱ्यांचे व्यापाऱ्यांना आश्वासन
एकलहरे शिवारात धाडसी दरोडा ; एकाचा खून

देवळाली प्रवरा ः राहुरी फॅक्टरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या एका किराणा दुकानाच्या मालकासह एका कामगाराने किराणा दुकानात काम करणार्‍या एका विवाहित महिलेची छेडछाड केली. या छेडछाडीच्या त्रासाला कंटाळून पिडीत महिलेने विषारी औषध सेवन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांने पोलिसात खबर देवूनही पोलिसांनी मात्र कानावर हात ठेवले आहे.  या प्रकारामुळे राहुरी फॅक्टरी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
              याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड माहामार्गालगत  किराणा दुकान असून येथे एक विवाहित महिला अनेक दिवसांपासून काम करते. सदर महिला काम करत असताना किराणा दुकानाचा मालक व किराणा दुकानातील एक कामगार तिच्याशी वारंवार अंगलगट करुन तिची वारंवार छेड काढण्याचा प्रयत्न करीत होते. तिच्याशी अंगलगट करुन पिडीत महिलेस त्रास दिला जात होता. याबाबत या महिलेने अनेक वेळा विरोध केला. मात्र या दोघांचे कारनामे सुरूच होते. दरम्यान या त्रासाला कंटाळून सदर विवाहित महिलेने विषारी औषध सेवन करुन जीवनयाञा संपविण्याचा प्रयत्न केला आहे. सदर महिलेवर विवेकानंद नर्सिग होममध्ये उपचार सुरु आहेत. सदर महिलेने याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, सदर किराणा दुकानाचा मालक व एक कामगार मी काम करत असताना माझ्याजवळ येऊन नको त्या ठिकाणी हात लावून सातत्याने लगट करत होते. याच किराणा मालकाचे यापुर्वीचे कारणामे उजेडात आले आहे. मात्र राजकीय हस्तक्षेप करून प्रकरणावर पडदा टाकण्यात प्रयत्न होत आहे. या महिलेने कुठलीही तक्रार करू नाही म्हणून पुन्हा एकदा राजकीय दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी पीडित महिलेच्या कुटुंबाकडून होत आहे. या किराणा दुकानातील कामगाराने यापूर्वीही याच ठिकाणी काम करणार्‍या महिलेशी असेच कृत्य केल्याने सदर महिलेच्या पतीने आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली होती. सदर किराणा दुकान मालक व कामगार यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई कारावी अशी मागणी सदर पीडित कुटुंबानी पत्रकारांशी बोलताना सांगितले. राहुरी पोलिस ठाण्यात याबाबत चौकशी केली असता असा कोणताही गुन्हा आमच्याकडे दाखल झाला नाही. असे ठाणे अंमलदार यांनी सांगितले. वैद्यकीय अधिकार्‍यांने पोलिसात खबर देवूनही पोलिसांनी माञ कानावर हात ठेवले आहे.  पोलिस ठाण्यातून एक हि पोलिस कर्मचारी या महिलेचा जबाब घेण्यास आला सुद्धा नाही.हि एक शोकांतिका आहे.

COMMENTS