Homeताज्या बातम्यादेश

रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्रे गहाळ

नवी दिल्ली ः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्याविरोधात दाखल करण्यात

कल्याणमध्ये विद्यार्थिनीचा डेंग्यूने मृत्यू
2026 च्या भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  पुनर्क्षिण कार्यक्रमास  प्रारंभकेज तालुक्यातील 2 लाख 10 हजार 956 मतदाराची माहिती होणार अद्येयावत
कर्नाटक सरकार विधानसभेतून हटवणार सावरकरांची प्रतिमा ; भाजप आक्रमक

नवी दिल्ली ः काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरशी संबंधित तपासात एसआयटीला धक्कादायक माहिती मिळाली आहे. बँकेच्या शाखेत पाण्यामुळे वाड्रा यांच्या कंपनी मेसर्स स्काय लाइट हॉस्पिटॅलिटीच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित महत्त्वाच्या नोंदी नष्ट झाल्याची माहिती युनियन बँक ऑफ इंडियाने हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाला दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण लागले आहे. एसआयटी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या विरोधात भ्रष्ट रिअल इस्टेट व्यवहारात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची चौकशी करत आहे.

COMMENTS