Homeताज्या बातम्या

राष्ट्रीय महामार्गावरील उमरा ते मेट कडे जाणारा रस्ता बंदवर्षभरापूर्वी बांधण्यात आलेला पूल पुराच्या पाण्याने तुटला वाहतूक बंद

माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेट कडे जाणारा रस्त्यावर एकमेव असलेल्या पूलाचे बांधकाम व्यवस्थित झालेले नस

फक्त रील बनवण्यासाठी थेट मृत्यूच्या दारात? पालघरच्या वंद्री धबधब्यावर अवघ्या २ मिनिटांत वाढली पाण्याची पातळी; थरारक व्हिडिओ आला समोर!
मुंबईत मृत्यूचे सत्र थांबेनाझाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू
ठाण्यात टायर गोदामाला आग; जीवितहानी नाही
माहूर-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील पूल तुटला - पुरोगामी विचाराचे एकमत

माहूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेट कडे जाणारा रस्त्यावर एकमेव असलेल्या पूलाचे बांधकाम व्यवस्थित झालेले नसल्याने या नाल्याला अनेक नाले जोडलेले असल्याने या नाल्यात सततच्या पावसाने पूर आला त्यामुळे पुल तुटून रस्ता बंद झाल्याने खळबळ उडाली असून मौजे सिंदखेड गावाला तिन्ही बाजूने घेरुन असलेल्या नाल्यालाही पूर आल्याने गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहेमाहूर शहरातून गेलेल्या राष्ट्रीय मार्ग महामार्ग क्रमांक 161 – वर माहूरपासून दहा किमी अंतरावर असलेल्या मौजे उमरा फाटा ते मेट कडे जाणार्‍या रस्त्यावर एकच पूल असून या नाल्याला मोठे पूर येतात बांधकाम व्यवस्थित झाले नसल्याने तसेच या नाल्याला अनेक छोटे मोठे नाले जोडलेले असल्याने अचानकपणे या नाल्यालां पूर येतो सततच्या पावसामुळे अचानकपणे पूर आला पुलाच्या खालील जागेत कचरा व झाडे अडकल्याने पाणी पुलावरून गेले त्यामुळे एकीकडचा फुल तुटला त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक दि 30 रोजी दुपारपासून बंद झालेली आहेमौजे सिंदखेड गावाला तिन्ही बाजू ने मोठ्या नाल्याने घेरलेले असून या नाल्यात मनीराम थड प्रकल्पाचे पाणी नाल्यातून जात असल्याने गावाला पुरामुळे धोका होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी  मौजे मेट कडे जाणार्‍या रस्त्यावरील पूल तुटल्याने मौजे मेट कडे जाणारा एकमेव रस्ता बंद झाल्याने संबंधित विभागांनी तात्काळ नाल्याची पाहणी करून रस्त्याची व्यवस्था करत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

COMMENTS