Homeताज्या बातम्या

अवैध प्रकारांची तक्रार केल्याचा राग?; वनपरिक्षेत्राधिकार्‍यांनी धमकी दिल्याचा भाजप पदाधिकार्‍यांचा आरोपहदगाव किसान सभेच्या तालुकाध्यक्षांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार; चौकशी करून कारवाईची मागणी

नांदेड वनपरिक्षेत्रातील कथित अवैध प्रकारांची तक्रार आणि वृत्त प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून नांदेडचे वनपरिक्षेत्राधिकारी अनिल रासने यांनी मोब

मंत्री झिरवाळ प्रकरणात आरोपीची;गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव
नीट आंदोलनामुळे मुंबईत कठोर निर्बंध; ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी, परवानगीशिवाय मोर्चा किंवा आंदोलन केल्यास कारवाईचा इशारा
कायद्याचा दणका: किनवटच्या वेशीवर ’दहशती’चा माज उतरला; हातात तलवार घेणारा हद्दपार आरोपी जेरबंद
Three forest officers missing during tiger census found safe after  night-long search in Kerala

नांदेड वनपरिक्षेत्रातील कथित अवैध प्रकारांची तक्रार आणि वृत्त प्रसिद्ध केल्याच्या कारणावरून नांदेडचे वनपरिक्षेत्राधिकारी अनिल रासने यांनी मोबाईलवरून धमकी दिल्याचा आरोप भाजप किसान सभेचे हदगाव तालुकाध्यक्ष विलासराव महाजन यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी नांदेडचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार देऊन सखोल चौकशी करून संबंधित अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महाजन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 6 जुलै 2026 रोजी त्यांनी नांदेड वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे नांदेड वनपरिक्षेत्रातील राखीव वनक्षेत्रात डिंक संकलनासाठी मोठ्या प्रमाणात झाडांना गंभीर जखमा करून धोकादायक रसायनांचा वापर होत असल्याची तक्रार केली होती. या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी व काही कर्मचार्‍यांच्या संगनमतातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या संदर्भातील वृत्तही विविध माध्यमांत प्रसिद्ध झाले होते.
या तक्रारीनंतर संतप्त झालेल्या वनपरिक्षेत्राधिकारी अनिल रासने यांनी मोबाईलवरून संपर्क साधून, तू आमच्या विभागाविरोधात तक्रार आणि बातमी का दिलीस? तू खूप मोठा कार्यकर्ता आहेस का? तुला बघून घेतो, अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप महाजन यांनी तक्रारीत केला आहे.
या कथित धमकीप्रकरणी महाजन यांनी 27 जुलै 2026 रोजी नांदेडचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली असून, कॉल रेकॉर्डसह प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

COMMENTS