Homeताज्या बातम्या

ठाण्यात टायर गोदामाला आग; जीवितहानी नाही

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात मंगळवारी एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण

फिलिपिन्समध्ये 7.8 तीव्रतेचा भूकंप
पावसाळ्याची चाहूल, सावधगिरीची गरज : बीड जिल्ह्यात नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
पुरुषोत्तम  पुरी यात्रेत भीषण बोट दुर्घटना!दोन महिला भाविकांचा मृत्यू,अनेक जखमी; ट्रस्ट व प्रशासनाच्या नियोजनावर संताप


ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मुंब्रालगतच्या शिलफाटा परिसरात मंगळवारी एका टायर गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून दूरवरूनही धुराचे प्रचंड लोट दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिलफाटा परिसरातील टायर साठवणूक गोदामात अचानक आग लागली. टायर आणि ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने वेगाने संपूर्ण गोदामाला विळखा घातला. घटनेनंतर परिसरात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

COMMENTS