Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी बस सुरू करण्यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने  मिरजगाव येथे रस्ता रोको

कर्जत : एसटी बस सुरू करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिरजगाव येथील क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन संघटनेचे दिव्यांग सेलचे तालुकाध्

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये
राज्यात उष्णतेचा कहर; अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी
बेसुमार वाळू उपशामुळे नदीपात्रांचा र्‍हास; पर्यावरणीय संकट अधिक गडद
Displaying 424034.jpg

कर्जत : एसटी बस सुरू करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मिरजगाव येथील क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन संघटनेचे दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, व विमलताई अनारसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कर्जत तालुक्यातील मिरजगाव परिसरामध्ये असणाऱ्या मिरजगाव, शिवाचा मळा, रवळगाव, कोंभळी, खांडवी, भोसा, पीर फाटा व मिरजगाव – कोंभळी – श्रीगोंदा या परिसरामध्ये तात्काळ एसटी बस सेवा सुरू करावी या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने मिरजगाव मधील क्रांती चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विमलताई अनारसे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय तनपुरे, रवींद्र गोरे,संपत बावडकर, सुभाष खेडकर,अण्णा बनकर,चंदू हुमे, मोहन खेडकर, रावसाहेब कांबळे,  बबन म्हस्के सुदाम निकत प्रहार संघटक श्री घोडे सर, गंगा बोरुडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

 यावेळी बोलताना दत्तात्रय तनपुरे म्हणाले की, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक यांना प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने पत्र देऊन मिरजगाव परिसरातील शिवाचा मळा रवळगाव कोंभळी खांडवी भोसा यासह विविध गावांना जाण्यासाठी एसटी बस सुरू करावी अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. तीस वर्षांपासून या परिसरातून एकही बस धावलेली नाही यामुळे परिसरातील शाळकरी विद्यार्थी वृद्ध महिला आजारी व्यक्ती अपंग यांची मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहे. वारंवार मागणी करूनही एसटी बस सुरू होत नसल्यामुळे अखेर प्रहार संघटनेला आज रस्त्यावर उतरावे लागले आहे. जर आमच्या मागणीप्रमाणे एसटी बस सुरू केली असती तर आम्हाला आंदोलन करावे लागले नसते. आता तात्काळ या एसटी बस सुरू कराव्यात अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री तनपुरे यांनी यावेळी दिला.

  बोलताना प्रहार संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विमल अनारसे म्हणाल्या की, कर्जत तालुक्यामध्ये एसटी महामंडळाची सेवा अतिशय खराब आहे. वारंवार मागणी करूनही मंजूर असलेला एसटी डेपो सुरू करण्यात येत नाही. प्रत्येक वेळेस वेगवेगळी तारीख एसटी महामंडळाचे अधिकारी जाहीर करत आहेत. दोन आमदार असूनही मतदारसंघांमध्ये जनतेचे हाल होत आहेत. आजही मिरजगाव परिसरामध्ये साध्या एस टी बससाठी आंदोलन करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही एसटी महामंडळाचे अधिकारी लक्ष देत नाहीत यामुळे या पुढील काळात यापेक्षा देखील तीव्र आंदोलन करू असा इशारा अनारसे यांनी यावेळी दिला.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बबन म्हस्के यांनी केले.

COMMENTS