Homeताज्या बातम्यासंपादकीय

कर्तव्यतत्परतेचा धडा !

आई या शब्दातच जादू आहे. आई म्हणजे एक अजब रसायन. तिच्याकडे असलेली प्रचंड सहनशीलता, तिच्याकडे असणारे ममत्व, भाव-भावनांचा मिलाफ म्हणजे आई. प्रत्येक

भारतीय हरितक्रांतीचा जनक
तापमानवाढ चिंताजनक  
तेलगे देसमचे भवितव्य ?

आई या शब्दातच जादू आहे. आई म्हणजे एक अजब रसायन. तिच्याकडे असलेली प्रचंड सहनशीलता, तिच्याकडे असणारे ममत्व, भाव-भावनांचा मिलाफ म्हणजे आई. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आईची भूमिका अनन्यसाधारण अशी असते. ज्याचे मोल कशातच करता येत नाही. काल सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन मोदी यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन झाले. निधनानंतरचे अंत्यसंस्कारांसह विविध विधी उरकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी आपल्या नेहमीच्या कामात व्यस्त झाले. यातून पंतप्रधान मोदी यांनी कर्तव्यतत्परेचा एक धडाच घालून दिला आहे.  मातृवियोगाच्या दु:खाला सामोरे जात असतांना देखील, या अतीव दु:खाच्या काळातही पंतप्रधानांनी जी कर्तव्य तत्परता दाखवली तीही आदर्श अशीच म्हणावी लागेल. कर्मयोग्याप्रमाणे पंतप्रधान दुपारनंतर आपली सारी कर्तव्य पार पाडताना दिसले.पश्‍चिम बंगालमधल्या वंदे भारत ट्रेनच्या उद्घाटनला त्यांनी ऑनलाईन हजेरी लावली. प्रत्यक्ष उपस्थितत न राहिल्यामुळे त्यांनी बंगालच्या जनतेची माफी मागितली. आईने केलेल्या संस्कारांमुळेच त्यांनी कर्तव्यतत्परता दाखवत विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.
नरेंद्र मोदी यांना देशाच्या सर्वोच्च अशा पंतप्रधान पदावर कार्य करतांना त्यांच्या आईने बघितले. आपला मुलगा आपल्या स्वकर्तृत्वाने राजकारणात सर्वोच्च असे पंतप्रधान पद धारण करतो, ही भावनांच प्रत्येक आईला सुखावणारी असते. आपला मुलगा, त्याने कोणतेही यश मिळवले, तरी आई प्रचंड आनंदी होते. अशावेळी नरेंद्र मोदी यांनी राजकारणात गुजरातचे मुख्यमंत्रीपद, दुसर्‍यांदा देशाचे पंतप्रधानपद भूषवित आहे. मात्र कधीही हळवे न होणारे नरेंद्र मोदी मात्र आईच्या निधनाने काहीसे हळवे झालेले दिसून आले. हळवे होण्यासारखे कारणही तसेच आहे. आयुष्यात गरीबीचे चटके सहन करतांना देखील, आपल्या मुलांवर चांगले संस्कार देणारी आई, आतापर्यंत कोणत्याही दागिन्यांचा कधीही सोस बाळगला नाही. सदैव निर्विकारपणे आयुष्य जगणारी पंतप्रधान मोदींची आई खर्‍या अर्थाने ग्रेटच म्हणावी लागेल. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांनी लिहिलेल्या ब्लॉकमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात ते म्हणतात आम्ही लहान होतो, तेव्हा शाळा बुडवून आपल्याला मदत करावी, असं तिने कधीच म्हटलं नाही. आमची घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती. आपल्या आईने खूप कष्ट केली. इतरांच्या घरी जावूनही कामं केली. जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ती सूत कताईचं काम करायची. माझी आई माझ्याशी गुजरातीतच बोलत होती. जेवढे दिवस मी घरी होतो तेव्हा ती मला गुजरातीतून हाक मारताना तू म्हणायची. पण मी मार्ग बदलला आणि घर सोडलं, त्यानंतर तिने मला कधीही एकेरी हाक मारली नाही. ती अजही मला तमे असं म्हणते, अशा आठवणी पंतप्रधानांनी सांगितल्या आहेत. मुलगा घर सोडून गेल्यानंतर आईला सर्वांत जास्त दुःख होते. मात्र आपला मुलगा घर सोडून गेला असला तरी, राज्य, देशच त्याचे घर आहे. आणि देशाचा प्रमुख म्हणून तो देशाचा गाडा आदर्श मार्गांवर आणि योग्य प्रकारे हाताळतो आहे, हे बघून पंतप्रधानांची आई नक्कीच सुखावत असणार. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घरी जाऊन आईची भेट घेत हितगुज केले होते. यातून त्या दोघांचा जिव्हाळा, एकमेकांविषयी असलेले प्रेम सुखावणारे असे दृश्य होते. मात्र आता असे दृश्य दिसणार नाही.

COMMENTS