Homeताज्या बातम्या

नांदेड जिल्ह्यातही ‘कोचिंग संस्कृती’चा वाढता प्रभाव; महाविद्यालयांतील उपस्थिती घसरली!

नांदेड : राज्यात उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या ‘कोचिंग संस्कृती’चा प्रभाव आता नांदेड जिल्ह्यातही स्पष्टपणे दिसून येत आहे. अकरावी-ब

शासकीय शाळांसमोर अस्तित्वाचे आव्हान! पहिलीच्या प्रवेशसंख्येत सलग घट; प्रत्येक बालक शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाची व्यापक मोहीम
गोदावरी नदीपात्रात नांदेड ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका; २ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, १० रेती माफियांवर गुन्हा
पत्रकार विनोद डाकोरे यांना ‘युवा पत्रकार गौरव पुरस्कार’ जाहीर; लोहा शहरासह नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण

नांदेड : राज्यात उच्च माध्यमिक शिक्षण क्षेत्रात वाढत असलेल्या ‘कोचिंग संस्कृती’चा प्रभाव आता नांदेड जिल्ह्यातही स्पष्टपणे दिसून येत आहे. अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची महाविद्यालयांतील उपस्थिती दिवसेंदिवस कमी होत असून, अनेक विद्यार्थी नियमित वर्गांना दांडी मारून खासगी कोचिंग क्लासेसमध्येच अधिक वेळ घालवत असल्याचे चित्र समोर आले आहे.

शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी किमान ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक केली असली तरी प्रत्यक्षात अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये या नियमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची चर्चा आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा कल विशेषतः वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी खासगी कोचिंग संस्थांकडे वाढला आहे. त्यामुळे महाविद्यालयातील नियमित अध्यापनावर परिणाम होत असून वर्गखोल्या अनेकदा अर्धवट रिकाम्या दिसत आहेत.

‘डमी’ महाविद्यालये बंद करण्याची मागणी: नांदेड शहरात अनेक कोचिंग क्लासेस व ‘डमी’ महाविद्यालये यांची छुपी युती झाली असून, विद्यार्थ्यांना कॉलेजला न जाता थेट वार्षिक परीक्षेला बसण्याची सूट दिली जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक अनुदानित महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीच नसल्याने प्राध्यापकांचे काम केवळ नावालाच उरले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांना सीईटी किंवा जेईई परीक्षेत ९५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळतात, मात्र बोर्डाच्या परीक्षेत केवळ ४० ते ४२ टक्के गुण मिळत आहेत. बोर्ड परीक्षेतील या कमी गुणांमुळे प्रवेशपूर्व परीक्षेत पास होऊनही अनेक विद्यार्थी पुढील प्रवेशापासून वंचित राहत आहेत.

COMMENTS