Homeताज्या बातम्या

दिव्यांगांच्या सहाय्यक साधन वितरणासाठी अहिल्यानगरमध्ये आढावा बैठक; खासदार निलेश लंके यांचे नियोजनाचे निर्देश

अहिल्यानगर: अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्

कर्नाटकात आढळले ७००० विद्यार्थी एचआयव्ही बाधित; सरकारकडून महाविद्यालयांत नियमित तपासणी व जनजागृती मोहीम
राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पाला हायकोर्टाचा ब्रेक! शेतकऱ्यांच्या रिट याचिकेची दखल; आठवडाभरात भूमिका स्पष्ट करण्याचे शासनास आदेश
रोटरी क्लबचे हरित बीडकडे आणखी एक पाऊल; ३५० देशी वृक्षांचे रोपण

अहिल्यानगर: अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील दिव्यांग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने व उपकरणे उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या मूल्यमापन शिबिरांच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

यावेळी बोलताना खासदार निलेश लंके म्हणाले की, “मतदारसंघातील जास्तीत जास्त दिव्यांगांना त्यांची हक्काची आणि आवश्यक सहाय्यक साधने मिळावीत, यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यावर विशेष भर दिला जाईल.”

पुढील आठवड्यात दिव्यांग संघटनांची स्वतंत्र बैठक

जिल्हा रुग्णालयात दिव्यांगांना येणाऱ्या विविध अडचणी, दिव्यांग प्रमाणपत्र मिळण्यातील त्रुटी आणि समस्या तसेच त्यावरील उपाययोजनांबाबत खासदार लंके यांनी महत्त्वाची घोषणा केली. या सर्व विषयांवर मार्ग काढण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्ह्यातील सर्व दिव्यांग संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आणि जिल्हा शल्यचिकित्सकांच्या (Civil Surgeon) उपस्थितीत एक स्वतंत्र बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या आढावा बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिव्यांग विभागाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे, खासदार निलेश लंके प्रतिष्ठान दिव्यांग संघटनेचे सुनील करंजुळे, सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर, प्रहार दिव्यांग संघटनेचे मधुकर धाडगे, पोपट शेळके, आसान दिव्यांग संघटनेचे संजय साळवे, लक्ष्मण पोकळे, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संतोष सरवदे, बाळासाहेब चव्हाण, जिल्हा सक्षमीकरण अधिकारी देविदास कोकाटे यांसह विविध विभागांचे शासकीय अधिकारी आणि दिव्यांग चळवळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS