सांगली शहरात बिबट्या घुसला

Homeताज्या बातम्या

सांगली शहरात बिबट्या घुसला

सांगली शहरातील रॉकेल लाईन, पटेल चौक परिसरात आज बुधवारी सकाळी बिबट्या घुसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बार्शी फटाक्याच्या स्फोटाने हादरले 9 कामगारांचा मृत्यू, 3 महिला गंभीर जखमी
स्टंट करताना ट्रेनला धडकल्याने तरुण गंभीर जखमी
देशाच्या भवितव्यासाठी प्रत्येक नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे काळाची गरज – समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे

सांगली / प्रतिनिधी : सांगली शहरातील रॉकेल लाईन, पटेल चौक परिसरात आज बुधवारी सकाळी बिबट्या घुसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या बिबट्याला पकडण्यासाठी पटेल चौक, स्टेशन चौक आणि राजवाडा चौक पोलिसांनी सील केला आहे.

आज बुधवारी सकाळी काही नागरिकांनी पटेल चौक परिसरात एक बिबट्या आल्याचे पाहिले. त्याने राजवाडा चौकातील एका बँकेजवळ कुत्र्यावर हल्ला करुन त्याला ठार केले. याबाबतची माहिती मिळताच नागरिकांनी बिबट्या पहायला प्रचंड गर्दी केली. हा बिबट्या पलूस मार्गे आल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिबट्यास पकडण्यासाठी वन विभागातील अधिकारी तसेच सांगली शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि महापालिका कर्मचारी यांनी संयुक्तरित्या शोध मोहीम राबवली आहे. महापालिकेच्यावतीने परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी करुन बिबट्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सांगली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख चिंतामणी कांबळे यांनी सांगितले आहे.

COMMENTS