Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंपळगाव खांड येथे वीर महाराज मंदिराचा जीर्णोद्धार

अकोले : तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील ग्रामदैवत वीर महाराज मंदिराचा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे ४० ते ५० लाख रुपये खर्च करून भव्य जीर्णोद्

शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक : मुख्यमंत्री फडणवीस; नागपुरात ‘महाराष्ट्र ज्ञान सभा-2026’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
नांदेडमध्ये अवैध सावकारीचा पर्दाफाश; कर्जदारांना डांबून खंडणी मागणार्‍या टोळीतील 5 जण अटकेत
खरात संबंधीत सर्व खाती गोठवली; समतातील सर्व व्यवहार पारदर्शी : संदीप कोयटे

अकोले : तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील ग्रामदैवत वीर महाराज मंदिराचा ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सुमारे ४० ते ५० लाख रुपये खर्च करून भव्य जीर्णोद्धार केला आहे. कोणत्याही आमदार-खासदारांकडे मदतीची अपेक्षा न ठेवता ग्रामस्थांनी अल्पावधीत हे मंदिर उभारल्याने परिसरात कौतुक व्यक्त होत आहे.

नूतन मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त सोमवार (दि. ३० मार्च) ते गुरुवार (दि. २ एप्रिल) दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्रिदिनी कीर्तन महोत्सवही पार पडत आहे.

सोमवार (दि. ३० मार्च) रोजी सकाळी ७ वाजता ह.भ.प. अरुणनाथजी गिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा होणार आहे. याच दिवशी वीर महाराजांच्या मूर्तीचे आगमन भव्य मिरवणुकीने होऊन होमहवन कार्यक्रम पार पडणार आहे.

महोत्सवादरम्यान ह.भ.प. किशोर महाराज खरात, ह.भ.प. विशाल महाराज खोले, ह.भ.प. भरत महाराज जोगी, ह.भ.प. पांडुरंग महाराज गिरी यांची कीर्तने होणार आहेत. गुरुवारी (दि. २ एप्रिल) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत रामगीरीजी महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

शुक्रवार (दि. ३ एप्रिल) रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ दरम्यान काठीची भव्य मिरवणूक व यात्रा पार पडणार असून रात्री ९ वाजता ‘जय मल्हार’ प्रस्तुत मातोश्री उद्योग समूह निर्मित ‘शुक्राची चांदणी’ हा ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या धार्मिक सोहळ्याचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन श्री क्षेत्र वीर महाराज देवस्थान, पिंपळगाव खांड तसेच सिदवड, ढगेवाडी, शेरेवाडी येथील ग्रामस्थांनी केले आहे.

COMMENTS