बीड : गेवराई तालुक्यातील सुर्डी येथील गायरान जमीन गट नं.82 येथे वास्तव्यास असलेल्या पारधी समाजाची पायल डिस्टीमन काळे या पिडीत मुलीस आणि इतर


बीड : गेवराई तालुक्यातील सुर्डी येथील गायरान जमीन गट नं.82 येथे वास्तव्यास असलेल्या पारधी समाजाची पायल डिस्टीमन काळे या पिडीत मुलीस आणि इतर महिलांना, पुरुषांना जातीवाचक शिवीगाळ करुन गंभीर मारहाण केल्याच्या प्रकरणात आरोपींनी दाखल केलेल्या जामीन अर्ज विशेष जिल्हा व सत्र न्यायालय, बीड यांनी नामंजुर केला.
याप्रकरणात सुर्डी ता. गेवराई येथील गायरान जमीनीवर अनेक वर्षापासुन आदिवाशी पारधी समाज पक्के घरे करुन 7 ते 8 कुटूंबे राहत आहेत. डिस्टीमन काळे यांचा मुलगा, मुलगी, पत्नी सुर्डी या गायरानात घर करुन राहतात. डिस्टीमन काळे येथेच गायराण शेती करुन उपजिवीका भागवित आहेत. ते कसत असलेल्या घराशेजारील बाजरीच्या शेतात चोपडयाचीवाडी येथील सखाराम टेहळे ता. गेवराई त्याच्या 34 साथीदारासह मेंढ्या घेवुन डिस्टमन काळे कसत असलेल्या त्याच्या शेतात सोडुन खावु घालु लागला तेव्हा त्याची मुलगी पायल हिने त्यांना मेंढ्या चारण्यास मज्जाव केला असता सखाराम टेहळे याने जातीवाचक शिवीगाळ केली. पारध्यांनो तुम्ही इथे कसे राहता ते पाहतो असे धमकावले पिडीताने वडीलांना फोन करुन बोलवुन घेतले तेव्हा सखाराम टेहळे यांनी त्याचे जोडीदार नामे अशोक कोळेकर, माऊली सोळंकु, तुका सोळंके, तुकाराम चोपडे, महादेव तुरे, बळीराम तुरे, लहानु चीलघर, अजय दाभाडे आसारामा चोपडे, नवनाथ कोळेकर, दादा अर्जुन, बाबुराव चिलघर, चंदर कोळेकर, नवनाथ कोळेकर व इतर 14 ते 15 जनांना दोन बोलेरो चारचाकी वाहनात घेवुन आला. त्यापैकी सखाराम टेहळे यांनी मला पुन्हा जातीवाचक शिवीगाळ करुन हात पकडुन लज्जा वाटेल अशी छेड काढली. आई शेवंता व मावशी रागबाई मध्ये आल्या असता त्यांना महादेव तुरे, अशोक कोळेकर यांनी काठ्यांनी मारहाण करुन जखमी केले. वरील सर्वांनी पारधी कुटूंबाची त्यांचे नातेवाईकांची घरे पाडली संसार उपयोगी सामानाचे घरात घुसुन नुकसान केले. जमीनीवरील दोन पाण्याचे बोर त्यामध्ये असणारी मोटर खाली सोडुन बोर बुजुन टाकले. पशु प्राणी सोडुन दिले त्यांचे पिण्याचे पाण्याचे स्त्रोत बंद केले. विहरीवर पाणी भरण्यास मज्जाव केला साधारणपणे 7 ते 8 (2) लाखाचे नुकसान केले. राजकीय दबाव टाकुन आमचे कोणी काहीही वाकडे करु शकणार नाही अशी धमकी दिली. पिडीत मुलीने पोलीस ठाणे तलवाडा येथे आरोपी विरुध्द तक्रार नोंदवुन पोलीस ठाणे तलवाडा यांनी आरोपी विरुध्द गुन्हा र.जि. नं.39/2026 अन्वये गुन्हा दाखल केला. बी.एन.एस. कलम 74,118(1),324(1),324(2),324(5),332(सी), 189(2), 190, 191 (2) आणि अनुसूचीत जाती जमाती जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सह कलम : 3(1)(आर)(एस),3(1)(डब्ल्यू)(आय),3(1)(डब्ल्यू)(आयआय),3(2)(व्हीए),3(1) (जी), (3) (1) (एक्स) अन्वये दिनांक 21/02/2026 रोजी तलवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद केली. आरोपी नामे महादेव ऊर्फ महादु, हारिभाऊ तुरे, तुकाराम सखाराम चोपाडे, लिंबाजी ऊर्फ दादा सखाराम अर्जुन, बळीराम हरिभाऊ तुरे, अनिल ऊर्फ तुका मच्छिंद्र सोळंके, अमोल ऊर्फ माऊली, मच्छिद्र सोळंके, लहानु देविदास चिलघर, रामचंद्र ऊर्फ चंदर आनंदराव कोळेकर, आसाराम आत्माराम चोपडे, अशोक ऊर्फ अजय दिलीप दाभाडे, नवनाथ साहेबराव कोळेकर, बाबुराव दगडु चिलघर, सखाराम बाबुराव टेहळे यांनी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश साहेब, बीड यांच्या न्यायालयात जामीन साठी फौजदारी जामीन अर्ज क्र. 187/2026 दाखल केला होता. सदरील आरोपींचा जामीन अर्ज मा. न्यायालयाने दिनांक.24/03/2026 रोजी नामंजुर केला. या आरोपींच्या जामीन अर्जाकडे संपुर्ण गेवराई तालुक्याचे तसेच राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते या कामी अॅड. गोरक्ष खेडकर, अॅड. सुनिल बळवंते, अॅड. सत्यनारायण ढाका यांनी फिर्यादीच्या वतीने युक्तीवाद केला. तसेच शासनातर्फे जिल्हा सरकारी वकील यांनीही युक्तीवाद केला. सदरील युक्तीवाद मा. जिल्हा अतिरीक्त सत्र न्यायाधिश साहेब, बीड यांनी ग्राह्य धरुन आरोपींचा जामीन अर्ज नामंजुर केला.

COMMENTS