Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा

आमदार अमोल मिटकरी यांची मागणी

पुणे ः पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. येणार्‍या विधिमंडळ अधिवेशनात या प्रकरणी

येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार मांडणार
न सांगता थेट प्रश्न करणे म्हणजे मिटकरींचा निव्वळ मुर्खपणा.
अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.

पुणे ः पुणे शहराचे नाव जिजाऊ नगर करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. येणार्‍या विधिमंडळ अधिवेशनात या प्रकरणी सरकारला साकडे घालणार असल्याचे ते म्हणाले. सध्याच्या शिंदे सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर असे केले आहे. त्यावरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप रंगत असतानाचा ही मागणी पुढे आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणतात की, पुणे शहराचे नामकरण जिजाऊ नगर व्हावे ही महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. येणार्‍या अधिवेशनात याबाबत सरकारकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी यांच्या मागणीला हिंदू महासभेने विरोध केला आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की, सर्व हिंदुत्ववादी आणि शिवभक्तांना जिजाऊमाता वंदनीय आहेत. मात्र, पुण्याला त्यांचे नाव देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही पुण्याचे नामांतर केले नाही. त्याऐवजी लाल महाल येथे राजमाता जिजाऊ यांचे स्मारक उभारावे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर केले. मात्र, शिंदे सरकारने हा निर्णय रद्द केला. त्यानंतर औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले. मात्र, या निर्णयाला अजून केंद्र सरकारने मंजुरी दिली नाही. येणार्‍या काळामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह जवळपास अठरा महापालिकांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा एकदा शहरांच्या नामांतराचा मुद्दा आणि त्याच्यावरून श्रेयवाद घेण्याचा प्रकार वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अशा वादात शहराच्या विकासावर कोणीच काही बोलत नाही, अशी खंत सुज्ञ नागरिक व्यक्त करत आहेत.

COMMENTS