Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

फुटबॉल विश्वचषक प्रसारणाबाबत दिलासा; पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

नवी दिल्ली : आगामी फुटबॉल विश्वचषक (FIFA World Cup) स्पर्धेच्या भारतातील प्रसारण हक्कांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आता संपुष्टात येण्याची चिन्

राष्ट्रवादीतील संभ्रमावस्था आणि सुंदोपसुंदी!
गुहा येथे उद्या गावधोंडा सोहळ्याची सांगता; महाविष्णू यागाची होणार पूर्णाहूती
ओबीसी, एससी, एसटी तरुणांना खुल्या प्रवर्गाच्या गुणवत्तेतून बाहेर काढण्याचे षड्यंत्र

नवी दिल्ली : आगामी फुटबॉल विश्वचषक (FIFA World Cup) स्पर्धेच्या भारतातील प्रसारण हक्कांबाबत निर्माण झालेली अनिश्चितता आता संपुष्टात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुढील आठवड्यात भारतीय प्रसारण भागीदाराची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, यामुळे देशातील फुटबॉलप्रेमींना मोठा दिलासा मिळणार आहे.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AIFF) माजी सरचिटणीस शाजी प्रभाकरन यांनी सामाजिक माध्यमांवर (Social Media) माहिती देताना, अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेला आता अंतिम रूप मिळाल्याचे संकेत दिले. त्यांनी म्हटले की, फुटबॉल विश्वचषकाच्या भारतातील प्रसारणासाठीची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून, चाहत्यांना लवकरच अधिकृत माहिती मिळेल. त्यांनी आगामी स्पर्धेला आतापर्यंतची सर्वात मोठी विश्वचषक स्पर्धा असे संबोधत प्रेक्षकांना सज्ज राहण्याचे आवाहनही केले.

यंदाची विश्वचषक स्पर्धा ११ जूनपासून सुरू होणार असून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको हे तीन देश संयुक्तपणे या आयोजनाची जबाबदारी सांभाळत आहेत. स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी अत्यंत अल्प कालावधी उरला असतानाही भारतातील कोणत्याही वाहिनीने प्रसारण हक्क मिळाल्याची अधिकृत घोषणा केलेली नव्हती. त्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणाने न्यायालयाचेही दार ठोठावले होते. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत देशातील सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी विश्वचषक सामने दूरदर्शन आणि क्रीडा वाहिन्यांवर दाखवावेत, अशी मागणी करण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान प्रसार भारतीने न्यायालयात स्पष्ट केले की, स्पर्धेचे प्रसारण हक्क मिळवणे ही त्यांची अनिवार्य जबाबदारी नाही. न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.

वकील अवधेश बैरवा यांनी दाखल केलेल्या याचिकेत गट फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंतचे महत्त्वाचे सामने सर्वसामान्य नागरिकांना विनामूल्य पाहता यावेत, यासाठी दूरदर्शनवर प्रसारणाची मागणी करण्यात आली होती. मात्र, १९ मे रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली आणि अन्य पर्यायांचा अवलंब करण्याचे संकेत दिले. फुटबॉलच्या जागतिक संघटनेने (FIFA) सुरुवातीला भारतातील प्रसारण हक्कासाठी मोठी आर्थिक अपेक्षा ठेवली होती. मात्र, बाजारातून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हक्कांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याचे वृत्त आहे. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मोठ्या प्रसारण समूहाची बोलीही नाकारण्यात आली होती.

COMMENTS