Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. डॉ. माया लहामगे-पाटील यांचा संशोधन कार्य पुरस्कार प्रेरणादायी : डॉ. बाबूराव उपाध्ये

श्रीरामपूर : टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा मिळालेला राज्यस्तरीय 'संशोधन आदर्श अध्यापक पुरस्कार' अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे

अमेरिका-इराण संघर्ष : १०७ दिवसांच्या युद्धाचा शांतता कराराने शेवट; बदलत्या जागतिक व्यवस्थेचा नवा धडा!
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या; टिटवाळा परिसरातील धक्कादायक घटना
राहुरीचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून रविंद्र देशमुख यांची नियुक्ती; गुन्हेगारी नियंत्रण आणि पुतळा विटंबना प्रकरणाचे मोठे आव्हान

श्रीरामपूर : टाकळीभान येथील ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा मिळालेला राज्यस्तरीय ‘संशोधन आदर्श अध्यापक पुरस्कार’ अनेकांना प्रेरणादायी ठरणारा आहे, असे मत श्रीरामपूर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे अध्यक्ष डॉ. बाबूराव उपाध्ये यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर येथील इंदिरा नगरमधील ग्रंथ वाचनालयात पारनेर येथील प्रा. डॉ. माया लहामगे-पाटील यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके आणि शाल देऊन वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी उपाध्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ. बाबूराव उपाध्ये बोलत होते. यावेळी दीपक पाटील यांनी सत्काराची प्रेरणा सदैव चांगल्या कार्याला बळ देते असे सांगून आभार मानले. याप्रसंगी तितिक्षा पाटील यांच्यासह उपाध्ये व पाटील परिवार उपस्थित होता.

प्रा. डॉ. माया लहामगे-पाटील यांनी सांगितले की, टाकळीभान येथील चौथ्या ग्रामीण साहित्य संमेलनात मिळालेला हा पुरस्कार म्हणजे दुर्लक्षित संशोधक व अध्यापकांना सेवाकार्यासाठी उपयुक्त ठरणारा आणि चांगले कार्य करण्यासाठी प्रेरक आहे. अर्जुन राऊत आणि त्यांची संस्था अनेकांना चांगले व्यासपीठ मिळवून देत आहे. चांगल्याला चांगले म्हणण्याची संस्कृती वाढली पाहिजे. अर्जुन राऊत यांच्या संवादी आणि जनसंपर्क गुणांचा आदर्श घेऊन ग्रामीण व शहरी भागातील इतरांनी हा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथ वाचनालयात झालेला हा सन्मान देवपूजेसारखा आहे, असे सांगून त्यांनी आभार मानले.

COMMENTS