Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आबुज यांना दिलासा, पण फक्त चार आठवड्यांसाठी! खानापूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच अपात्रतेच्या आदेशाला खंडपीठात स्थगिती

बीड : ‘बकरे की माँ कब तक खैर मनाएगी’ अशी अवस्था खानापूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांबाबत झाली आहे. जिल्हाधिकार्यांनी पंडित आबूज आणि सोजरबाई

पाटोदा नगर पंचायत सदस्य अपात्रता प्रकरणात निकालासाठी जिल्हाधिकार्‍यांना 4 आठवड्यांची मुदत; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
पाटोदा नगर पंचायत सदस्य अपात्रता प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांना चार आठवड्यांची मुदत; उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
तांदळवाडी घाट पानंद रस्ते कामात नरेगा घोटाळ्याचा आरोप; नितीन सोनवणे यांची कायदेशीर नोटीस

Beed News: बीड नगरपालिकेत होणार चौरंगी लढत, क्षीरसागर बंधूंबरोबरच पंडितांची  प्रतिष्ठा पणाला | महाराष्ट्र बातम्या - News18 Marathi

बीड : ‘बकरे की माँ कब तक खैर मनाएगी’ अशी अवस्था खानापूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांबाबत झाली आहे. जिल्हाधिकार्यांनी पंडित आबूज आणि सोजरबाई क्षीरसागर यांना सरपंच, उपसरपंच पदावरून अपात्र घोषित केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी देखील जिल्हाधिकार्यांचा आदेश कायम ठेवत स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर या दोघांनीही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात स्थगिती अपिल दाखल केले होते. यात खंडपीठाने जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या अपात्रता आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. शिवाय विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या अपिलावर चार आठवड्यात अंतिम निर्णय द्यावा, असे आदेश पारित केले आहेत. म्हणजेच या दोघांनाही महिनाभराचा दिलासा आहे. याबाबत अपिलकर्ते विकास खंडू कांबळे म्हणाले, खंडपीठाचा स्थगिती आदेश म्हणजे कायमस्वरूपी पदावर बसण्याचा अधिकार नाही. महिनाभरानंतर का होईना दोघांनाही पदावरून पाय उतार व्हावंच लागणार असल्याचे ते म्हणाले.
खानापूर ग्रामपंचायतीच्या राजकारणात पत्रकार बालाजी मारगुडे आणि जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांच्यात राजकीय सामना आहे. 2023 साली झालेल्या निवडणुकीत आबुज यांच्या पॅनलने विजय मिळवला होता. त्यासाठी माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी आपली प्रतिष्ठा आबुज यांच्यासाठी पणाला लावली होती. विधानसभेच्या आमदाराने थेट छोट्याश्या ग्रामपंचायतीत लक्ष घातल्याने संपूर्ण मतदारसंघाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. निकालानंतर विकास खंडू कांबळे यांनी सरपंच, उपसरपंच यांच्या निवडीवर आक्षेप घेतला. या दोघांनी देखील उद्यानासाठी राखीव असलेल्या 5 एकर भुखंडावर प्लॉटींग पाडून ते विकले होते. तर काही फ्लॉट स्वतःसाठी ठेवलेले होते. हा संपूर्ण प्रकार ग्रामपंचायतीच्या रेकॉर्डवर आहे. जेव्हा जिल्हाधिकार्यांकडे अपिल झाले तेव्हा अतिक्रमण तपासण्यासाठी बीडीओच्या नेतृत्वात विस्तार अधिकार्यांनी गावात येऊन प्रत्यक्ष पाहणी करीत ग्रामपंचायतीच्या अभिलेखाची देखील तपासणी केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालात अतिक्रमण असल्याचे आणि अभिलेखात व्हाईटनर लावून खाडाखोड केल्याचे स्पष्टपणे नमूद आहे. जिल्हाधिकार्यांनी देखील हा प्रकार गंभीर असल्याचे आपल्या निकाल पत्रात म्हटले होते. त्यावरूनच पंडित आबूज आणि सोजरबाई क्षीरसागर यांना अपात्र घोषित केले होते.  जिल्हाधिकार्यांच्या या निर्णयाला स्थगिती मिळावी यासाठी त्यांनी विभागीय आयुक्तांकडे स्थगिती अपिल दाखल केले होते. मात्र विभागीय आयुक्तांनी देखील आबुज आणि क्षीरसागर यांनी केलेले कारनामे पाहून स्थगितीस नकार दिला होता. त्यानंतर त्यांनी खंडपीठात स्थगिती मिळवण्यासाठी अर्ज केला. इथे त्यांना न्यायमुर्ती एस.जी. चपळगावकर यांनी तात्पुरता म्हणजेच चार आठवड्यांचा दिलासा दिलेला आहे.  शिवाय विभागीय आयुक्तांनी हे अपिल चार आठवड्यात निकाली काढावे असे आदेशीत केले आहे. त्यामुळे कल्याण आबुज गटाला आजचे मरण उद्यावर एवढ्याच साठी आनंद व्यक्त करता येईल, असे विकास खंडू कांबळे यांनी म्हटले आहे.

COMMENTS