Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीत निवडणूक प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर

लोकसभा निवडणुकीसाठी घेतला आढावा

राहुरी ः आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रशासनाची सध्या जय

कर्जतमध्ये लाकडाची अवैध वाहतूक करणारे पीकअप पकडले
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करुन आरोपींना लवकरात लवकर फाशी व्हावी
आ. निलेश लंकेंची सातासमुद्रापार दखल, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन’ने सन्मान l पहा LokNews24

राहुरी ः आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रशासनाची सध्या जय्यत तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकार्‍यांच्या निवडणूक विषयक विविध बैठका व प्रशिक्षण प्रक्रिया होत आहे.37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघांमध्ये 223 राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण 307 मतदान केंद्रे असून तीन तालुक्यात विभागलेल्या या मतदारसंघात राहुरी तालुक्यात 198 मतदान केंद्रे आहेत तर पाथर्डी तालुक्यातील 59 मतदान केंद्र तर नगर तालुक्यात 70 मतदान केंद्रांचा यात समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगरचे पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहाय्यक अधिकारी तथा राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापूर, ए. के. टेमक आदी अधिकारी, कर्मचार्‍यांकडून ही तयारी सध्या सुरू आहे. नुकतेच 307 मतदान केंद्र अधिकार्‍यांची बैठकीत प्रशिक्षणासह मतदार जागृती, 85 प्लस अर्थात ज्येष्ठ नागरिकांसाठीची माहिती, दिव्यांगासाठीची माहिती तसेच अत्यावश्यक सेवेतील मतदारांची माहिती आदी विषयांवर अधिकार्‍यांनी मार्गदर्शन केले. याशिवाय राखीव अधिकार्‍यांसह मतदार संघातील 35 क्षेत्रीय अधिकारी (सेक्टर ऑफिसर) यांचेही प्रशिक्षण घेण्यात आले. राहुरी तालुक्यातील विविध महाविद्यालयातील संबंधित विद्यार्थी, प्राध्यापकांना नोडल अधिकारी व कॅम्पस म्बेसिडरची आणखी एक कार्यशाळा पार पडली. त्यात मतदार नाव नोंदणी मतदार करण्यासाठीची जनजागृती करण्यासाठी विविध स्पर्धा पथनाट्य व अन्य जनजागृती विषयक मार्गदर्शन करण्यात आले. एकंदरीत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्‍वभूमीवर राहुरी मतदार संघातील निवडणूक प्रशासन क्शन मोडवर आलेला दिसून येत आहे

COMMENTS