Homeताज्या बातम्या

शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभाग बीड जिल्हाप्रमुखपदी ए. एस. गोलू यांची नियुक्ती

बीड : बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहरोद्दिन उर्फ ए. एस. गोलू यांची शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभागाच्या बीड जिल्हाप्रमुखपदी नियुक

माता-बाल संगोपनात बीड राज्यात अव्वल; मात्र 21 कोटींची माता व बाल संगोपन इमारत अडीच वर्षांपासून धुळखात पडुनपालकमंत्री सुनेत्राताईंनी दिवंगत अजितदादांचे स्वप्न पूर्ण करावे – डॉ. गणेश ढवळे
आष्टी-शिदेवाडी फाटा रस्ता खड्डेमय; 2 किमी मार्गावर 1,500 खड्डे, नागरिकांचा जीव धोक्यातरुंदीकरण व नव्याने डांबरीकरणाची तातडीची मागणी; आंदोलनाचा इशारा
वक्फ मंडळात तोंड बघून कामे केली जात आहेत का? महत्त्वाच्या प्रकरणांकडे दुर्लक्षदहा दिवसांत मंडळ बरखास्त करा, अन्यथा जनआंदोलन-शेख नदीम


बीड : बीड येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहरोद्दिन उर्फ ए. एस. गोलू यांची शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक विभागाच्या बीड जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, कार्याध्यक्ष समीर गुलामनबी काझी यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली. पक्ष संघटना अधिक बळकट करणे तसेच अल्पसंख्यांक समाजामध्ये शिवसेनेची भूमिका आणि पोहोच प्रभावीपणे वाढवणे, ही प्रमुख जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पक्ष नेतृत्वाने अपेक्षा व्यक्त केली आहे की ए. एस. गोलू हे धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा प्रसार करून सर्व समाजघटकांना सोबत घेऊन पक्षविस्तारासाठी कार्य करतील. या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही नियुक्ती जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप, स्वप्निल भैया गलधर आणि सचिन भैय्या मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

COMMENTS