Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर

रेल्वेमार्गाचे 147 किलोमीटरचे काम पूर्ण

अहमदनगर ः अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमा एकमेकांना लागून असल्या तर दोन्ही जिल्ह्यांच्या दळणवळणाच्या सोयी-सुविधा अपुर्‍या असल्याचे दिसून येतात

अवैधरित्या गोमांस विक्री करणारे आरोपी जेरबंद
एकतर्फी प्रेमातून मुलीला ठेवले डांबून ; नगरच्या एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
शिवसेना नगरसेवकाची दादागिरी l पहा LokNews24

अहमदनगर ः अहमदनगर आणि बीड जिल्ह्यांच्या सीमा एकमेकांना लागून असल्या तर दोन्ही जिल्ह्यांच्या दळणवळणाच्या सोयी-सुविधा अपुर्‍या असल्याचे दिसून येतात. रस्ते वाहतुकीला प्रवासी प्राधान्य देत असले तरी, आता अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर असल्यामुळे दोन्ही जिल्हे रेल्वेने जोडल्यामुळे दळणवळणाच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
एप्रिल 2023 पासून ते आजपर्यंत या रेल्वेमार्गाचे 147.77 किमी मल्टीट्रॅकिंग (नवीन लाइन, दुहेरी, 3री, 4थी लाइन) पूर्ण केली आहे. या महामार्गावर एकूण 23 स्थानके असून, या रेल्वेमार्गाची लांबी 261.25 किलोमीटर असून, आजपर्यंत 147 किमीचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. सुमारे 4 हजार 805.17 कोटी रुपयांचा अहमदनगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचा एकूण 261.25 किलोमीटरचा हा प्रकल्प आहे. या मार्गासाठी 1814.58 हेक्टर जमीन संपादित केली आहे. या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यास अहमदनगर-बीड जिल्ह्यातील नागरिकांना एकमेकांच्या शहरात प्रवास करणे सुलभ होणार आहे. यातून रोजगार, शैक्षणिक, आरोग्याच्या सोयी-सुविधा उपलब्ध होऊन, त्यातून सामाजिक-आर्थिक विकास होणार आहे.

 अहमदनगर-बीड- परळी-वैजनाथ नवीन रेल्वे लाईन
लांबी – 261.25 किमी
लांबी कार्यान्वित – 66.18 किमी
उर्वरित – 195.25 किमी
एकूण रेल्वे मार्गाची प्रगती ः 78 टक्के
जमीन संपादन -1821.56/1806.19 हेक्टर (99%)
किंमत – रु.  4805.17 कोटी
आजपर्यंतचा खर्च -रुपये 3699 कोटी.

पूर्ण झालेला विभाग –  अहमदनगर ते आष्टी (66.18 किमी)
ह्न पूर्णत्वाच्या जवळ-
 (या आर्थिक वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे)
 आष्टी ते एगनवाडी (66.12 किमी) प्रगतीपथावर
 इगनवाडी ते परळी (127.95 किमी)

COMMENTS