Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजधानी एक्स्प्रेसला रेल्वे अधिकार्‍यांच्या भांडणामुळे विलंब

मुंबई : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि मुंबई विभागातील तिकीट तपासनीसांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यानंतर अध

सह्याद्री गेस्ट हाऊससह शासकीय बंगल्यांची कामे न करताच कोट्यवधींची बिले काढत भ्रष्टाचाराचा विक्रम; मलबार हिल पीडब्ल्यूडी विभागातील मोठे रॅकेट उघड
कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश; आरोग्य विभागाचा माजी उपसंचालक सूत्रधार
भेसळीच्या दुधाचा काळाबाजार करणार्‍यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई.पॅकिंग दूध कॅनमध्ये मिसळून दूधवाले करत होते विक्री;भेसळखोरांवर कठोर कारवाईचा इशारा.

मुंबई : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि मुंबई विभागातील तिकीट तपासनीसांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यानंतर अधिकार्‍याने तिकीट तपासनीसाला धमकी दिली. तसेच संतप्त झालेल्या अधिकार्‍याने तिकीट तपासनीसावर मद्याप्राशनाचा आरोप केला. मात्र या वादात प्रतिष्ठित मानली जाणारी मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस जळगाव स्थानकातून तब्बल 13 मिनिटे उशिरा सुटली.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक रामनिवास मीना शुक्रवारी नाशिक रोड स्थानकाची पाहणी करीत होते. त्यानंतर जळगावकडे जाण्यासाठी गाडी क्रमांक 22221 राजधानी एक्स्प्रेसने नाशिक रोड येथून डबा क्रमांक ‘एच 1 ए’मध्ये बसले. यावेळी त्यांचा ‘पीएनआर’ तयार केला नव्हता. नाशिक रोडवरून राजधानी सुटली असता स्वच्छतेच्या कारणासाठी तिकीट निरीक्षक निखिल राठोड यांनी त्यांना ‘ए’ डब्यात जाण्यास सांगितले. या डब्यांमधून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रवास करीत होते. त्यामुळे आधी त्यांच्या डबा स्वच्छ करण्यासाठी कर्मचार्‍यांना पाठवण्यात आले होते. यामुळे मीना यांचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. “ घटनेची चौकशी सुरू आहे’’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले. 

COMMENTS