Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तळेगाव दिघेमध्ये फोडले बँकेचे एटीएम

सुमारे पाच लाखाची रोकड लंपास

संगमनेर ः संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची र

तनपुरे कारखान्यातील गैरव्यवहाराची चौकशी करा
वाळू तस्कराचा महसूल पथकातील तलाठ्यावर हल्ला
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात चित्रकला स्पर्धा उत्साहात

संगमनेर ः संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री इंडियन ओव्हरसीज बँकेचे एटीएम फोडून सुमारे पाच लाख रुपयांची रोकड लांबविली असल्याची माहिती समोर येत आहे. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने हे एटीएम मशीन फोडले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे घटनास्थळी दाखल झाले होते. प्राथमिक माहितीनुसार या एटीएम मशीन मधून अज्ञात चोरट्यांनी चार लाख 84 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथकाने नगरहून फिंगरप्रिंट व श्‍वानपथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. संबंधित बँकेचे अधिकारी घटनास्थळी आल्यानंतर या संदर्भात अधिक माहिती समोर येणार असून त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती मिळते. 

COMMENTS