Homeताज्या बातम्याशहरं

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आजचा मुक्काम कोठे?

सातारा / प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा व कोल्हापूरच्या राजघराण्

सकल हिंदू समाजातर्फे ’हिंदू गर्जना’ भव्य मोर्चा
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटींचा निधी मंजूर
बारावीतील विद्यार्थ्याची वाघोली येथे आत्महत्या

सातारा / प्रतिनिधी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांची बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सातारा व कोल्हापूरच्या राजघराण्यातील व्यक्तीविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सातारच्या न्यायालयाने दि. 18 पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज (सोमवार, दि. 18 रोजी) त्यांना सातारच्या न्यायालयात सुमारे सायंकाळी 5 वाजता हजर करण्यात येणार आहे. आले. या सुनावणीदरम्यान अ‍ॅड. सदावर्ते यांना न्यायालयाचा दिलासा मिळणार की, काय? अथवा इतर जिल्ह्यातून आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार?
मराठा आंदोलनादरम्यान, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व श्री. छ. संभाजीराजे भोसले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सातारा शहर पोलीस ठाण्यात सन 2020 मध्ये एक गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार अ‍ॅड. सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी मुंबई येथे अटक केली होती. सुनावणीदरम्यान, अ‍ॅड. सदावर्ते 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. आज, दि. 18 रोजी पोलीस कोठडी संपल्याने न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अ‍ॅड. सदावर्ते यांच्या विरोधात गुन्हे दाखल असलेल्या विविध जिल्ह्यातील पोलिसांनी सातार्‍यात कालपासून तळ ठोकला आहे. त्यामुळे अ‍ॅड. सदावर्ते यांचा आजचा मुक्काम स्व:ताच्या घरात की, सातार्‍यात की अन्य कोणत्या जिल्ह्यात याचीच चर्चा सर्वत्र सुरु आहे.

COMMENTS