Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विशेष अधिवेशनात आवाज उठवा सकल मराठा समाजाचा आक्रोश  

नाशिक प्रतिनिधी -  सकल मराठा समाज आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात भूमिका मांडावी यासाठी आज नाशिक पूर्वचे आमदार

सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण द्या
आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
कुणबी नको, स्वतंत्र आरक्षण द्या

नाशिक प्रतिनिधी –  सकल मराठा समाज आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनात भूमिका मांडावी यासाठी आज नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांना सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांच्या निवासस्थानासमोर आक्रोश आंदोलन करत निवेदन देण्यात आले. 

सदर निवेदनात म्हटले आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मराठा आरक्षणासंदर्भात येत्या २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलविले असून या अधिवेशनामध्ये विधानसभेचे सदस्य आणि लोकप्रतिनिधी म्हणून तुमची जबाबदारी आहे की खालील दिलेल्या मराठा समाजाच्या मागण्यां संदर्भात आपण आपली भूमिका विधान भवनात स्पष्ट करावी.

मराठा समाजाच्या ठळक मागण्या 

१) सकल मराठा समाजाला ५०% च्या आत ओबीसीतून घटनात्मक आरक्षण द्यावे.

२) सरकार दप्तरी सापडलेल्या ५५ लाख नोंदी च्या अनुषंगाने त्वरित ओबीसी प्रमाणपत्र वाटप सुरू करावे.

३) सगे-सोयरे बाबत जो मसुदा तयार केला होता त्या मसुद्याचे तात्काळ कायदयात रूपांतर करावे.

४) मराठा आरक्षण आंदोलनातील सर्व गुन्हे त्वरित मागे घ्यावे.

५) शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी त्याचबरोबर या समितीला मुक्तपणे काम करण्याचे अधिकार देण्यात यावे.

६) मागासवर्ग आयोगाला मुदतवाढ देऊन मराठा समाजाचे फेर सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावे.

या सर्व मागण्यांच्या संदर्भात २० फेब्रुवारी च्या विशेष अधिवेशनात आपण आक्रमकपणे मराठा समाजाच्या बाजूने भूमिका मांडावी असे न केल्यास आपण मराठा समाजाच्या प्रश्नी उदासीन आहात असे समजण्यात येईल व येणाऱ्या निवडणुकीत मराठा समाज आपल्या बाबतीत योग्य ती भूमिका घेईल याची देखील नोंद घेण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी या ठिकाणी गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण करत असताना अजुन एकही आमदार,खासदार,मंत्री त्यांच्या पाठीशी उभे राहताना दिसत नाही म्हणून आज आमदारांना जाग करण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या संदर्भात २० तारखेला होणाऱ्या अधिवेशनात समाजाची बाजू भक्कमपणे मांडावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे. जे आमदार मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहणार नाही त्यांना येणाऱ्या निवडणुकीत समाज नक्कीच धडा शिकवेल त्यामुळे आमदारांनी आता समाजासाठी विधान भवनात आवाज उठवावा कारण मराठा समाज त्यांच्यावर आता लक्ष ठेवून आहे याचीही नोंद घ्यावी.- करण गायकर – राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा 

आज सकल मराठा समाजाच्या वतीने मला निवेदन मिळाले त्याची दखल घेत मी जबाबदारी घेतो की नाशिक जिल्ह्यातील सर्व आमदारांना मराठा आरक्षण प्रश्नावर २० तारखेच्या विशेष अधिवेशनात आक्रमक भूमिका मांडण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी मी त्यांना प्रवृत्त करेल मराठा समाजाच्या वतीने आज मला जे पत्र दिलं आहे ते माझ्या ऑफिसमधून माझ्या पत्रावर सर्व नाशिक जिल्ह्यातील आमदारांना तात्काळ पाठवून आम्ही आमची सर्वांची भूमिका ही नक्कीच त्या ठिकाणी एक मताने मांडून मराठा समाजाला त्यांच्या हक्काचा आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. – राहुल ढिकले आमदार नाशिक पूर्व

COMMENTS