Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक

9 ऑगस्टपूर्वी निर्णय घ्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, आरक्षणाच्या प्रश्‍नाला अग्रक्रम देवून तो त्वरित सोडवावा, अन्यथा मराठ

विशेष अधिवेशनात आवाज उठवा सकल मराठा समाजाचा आक्रोश  
कुणबी नको, स्वतंत्र आरक्षण द्या
सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण द्या

छ.संभाजीनगर/प्रतिनिधी ः आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, आरक्षणाच्या प्रश्‍नाला अग्रक्रम देवून तो त्वरित सोडवावा, अन्यथा मराठा समाज मुंबईमध्ये आंदोलन छेडेल, असा इशारा देण्यात आला. मराठा क्रांती ठोक मार्चाच्या वतीने रविवारी कायगाव टोका येथे रस्ता रोको आंदोलन केले. 9 ऑगस्ट क्रांती दिनापूर्वी निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबईला आंदोलन केले जाईल. असा इशारा यावेळी रमेश केरे पाटील यांनी दिला.
सरकारच्या वेळखाऊ धोरणाविरोधात निदर्शने देण्यात आली. आक्रोशही व्यक्त केला. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 40 वर्षांपासून आरक्षणासाठी सकल मराठा समाज संघर्ष करत आहे. सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली. मात्र, आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही. यामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. त्याचा भडका 2016 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथून मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात उमटला होता. त्यानंतर 58 मुक मोर्चे निघाले. काँग्रेस व भाजप सरकारने आरक्षण दिले. त्रूटी असल्याने तेही सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. आता पुन्हा आयोग नेमून सर्वेक्षण केले जात आहे. सरकारच्या वतीने वेळखाऊ धोरण सुरु असल्याने मराठा तरूणांचा संयम सुटत चालला असून मुंबई येथे आंदोलन सुरु आहे. तर 27 जुलै रोजी मराठा क्रांती ठोक मार्चा, आदी मराठा संघटना, सकल मराठा बांधवांच्या वतीने कायगाव टोका येथे रस्ता रोको आंदोलन करून 9 ऑगस्ट पूर्वी सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबई येथे गनीमी काव्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा निर्वाणीचा इशारा, केरे पाटील, किशोर शिरावत, आदींनी दिली. आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा तरूणांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. पाच वर्षांपूवी मराठा आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलनात सहभागी झालेले काकासाहेब शिंदेंचा दुर्दैवी गोदावरी पा़त्रात पडून मृत्यू झाला होता. त्या घटनेला आज पाच वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त मराठा बांधवांनी श्रद्धांजली अर्पण केली.

COMMENTS